Goa Education  Dainik Gomantak
गोवा

Goa Education: बोरी गाव जणू गोव्‍याचे ‘शैक्षणिक हब’!

चौफेर प्रगती : विविध शैक्षणिक संस्‍था कार्यरत, अनेक विद्यार्थी घडविले; फुलांचे उत्‍पादन वाढले; मात्र शेतीकडे लोकांचा कल होतोय कमी

दैनिक गोमन्तक

रमेश वंसकर

बोरी: बोरी गावातील लोकांचे जीवनमान आता उंचावले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातही गाव आघाडीवर आहे. लहान मुले, विद्यार्थी संगीत, गायन वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. गावातील क्लब, सामाजिक कार्य करणारी प्रतिभा फ्रेंडस सर्कलसारखी संस्था आज राज्यस्तरावर प्रसिद्ध आहे. रस्ते, वीज, पाणी या सर्वसामान्याच्या गरजाही पूर्ण झालेल्या आहेत.

(standard of living of the people of Bori village has now increased)

गावातून जाणारा प्रमुख रहदारीचा रस्ता आणि जुवारी नदीवरील बोरीच्या पुलामुळे दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्याला जोडणारा हा दुवा बनून राहिला आहे. आज बेळगाव, हुबळी, धारवाड, कोल्हापूर, सांगली आदी भागातून वास्को, मडगाव, काणकोण, कारवार या भागात याच रस्त्याने वाहने येजा करतात. वास्को बंदरातून येणाऱ्या मालाची ने-आण वेर्णा सां-जुझे औद्योगिक वसाहतीतून गावातून होते. म्हणूनच दिवसभर बोरी गावातील रस्ते वाहनांनी भरून गेलेले दिसतात. या रस्त्याने वा पुलावरून होणारी वाहतूक पाहता हा रस्ता वाहतुकीसाठी खूपच तोकडा पडतो.

गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री नवदुर्गा तलावाचे सौंदर्यीकरण, सिद्धनाथ पर्वताचा विकास, नाल्यांची स्वच्छता, शेती-बागायतींसाठी पाणीपुरवण्याची योजना चालीस लागली आहे. आरोग्याच्या सुविधाही उपलब्‍ध आहेत.

गावात सर्वत्र फुलांचा दरवळ

बोरी हा गावा तसा कृषीप्रधान. परंतु अलीकडच्या काळात मोलमजुरी आणि बियाणे, खतांचे दर गगनाला भिडत असल्याने लोकांनी आपला शेतीचा उद्योग सोडून दिला आहे. दुसरीकडे जाई, मोगरा, बकुळी, चाफा, केवडा, सुरंगी आदी फुले या गावात मोठ्या प्रमाणावर फुलतात. बोरी गावचे आद्यग्राम दैवत श्री नवदुर्गा देवी, श्री सिद्धनाथ, श्री कमळेश्‍वर, श्री नारायणदेव, श्री साईबाबा मंदिर आदी मंदिरांमुळे बोरी गावात भाविकांचा ओढा वाढत आहे.

सर्वच क्षेत्रांत गाव प्रगतिपथावर

गोवा मुक्तीनंतर बोरी गावाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली असून शासनाचेही आवश्‍यक पाठबळ आणि सहकार्य लाभत आहे. त्‍यामुळे गावात विकासाचे वारे वाहत आहे. आज बोरी गाव सर्व क्षेत्रात प्रगतिपथावर असलेला दिसून येतो, असे विश्‍वंभर देवारी म्हणाले. तर, बोरी गावचे माजी सरपंच सुनील सावकर म्हणाले, भाजप सरकार आणि मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या प्रयत्नाने बोरी गावचा सर्वांगीण विकास तर झालेला आहे. शिवाय सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण झाल्‍या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach: मित्रांसोबतची गोवा ट्रिप ठरली अखेरची! 23 वर्षीय हैद्राबादचा तरुण समुद्रात बुडाला; कळंगुटमधील घटना

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

SCROLL FOR NEXT