Vasco market dainik gomantak
गोवा

holi festival : वास्को बाजारात रंगाची चढ्या दराने विक्री

बाजारात चायना माल नसल्याने देशी रंगाच्या किंमत वाढ

दैनिक गोमन्तक

वास्को : देशभरात धुलिवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम फारच कमी प्रमाणात करण्यात आला. रंगोत्सवाचे सार्वजनिक कार्यक्रम कोरोनामुळे रद्द झाले होते. पण या वर्षी रंगोत्सवाचा आनंद लुटला येणार आहे. त्याप्रमाणे गोव्यातील अनेक बाजारपेठा सज्ज झाल्या असून रंगबेरंगी रंग विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. वास्को बाजारात रंगबेरंगी रंग विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. तर रंगाची चढ्या दराने विक्री सुरू आहे. यंदा चायना माल खरेदी केला नसल्याने देशी रंगाची किंमत जास्त असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. (The sale of color in the Vasco market)

राज्यात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून गावागावात या होळीचे (Holi) पुजन केले जाते. ५ ते १५ दिवसपर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिमगोत्सवात (Shigmo) रंगपंचमीला लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व रंग खेळण्यासाठी उत्सूक असतात. त्यामुळे दोन दिवस धुलीवंदनाला राहिले असल्याने रंग बाजारात उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच पिचकारीही विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. वास्को (vasco) बाजारात रंगबेरंगी रंग आले असून १२० रुपये किलोने रंग विकले जात आहेत. तर मुख्य बाजारपेठेत रंगाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे दुकानदाराने माहिती दिली आहे.

वास्को शहरात मोठ्या उत्साहात धुलीवंदन

कोरोना (Corona) कारणामुळे दोन वर्षे वास्को येथे होणारा सार्वजनिक धुलिवंदन कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. मात्र यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने आणि लसीकरण (Vaccination) पूर्णझाल्याने वास्को शहरात मोठ्या उत्साहात धुलीवंदन होणार आहे. गावागावात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच धुलिवंदनही ठराविक दिवशी असते. काही गावात पाचव्या दिवशी धुलिवंदन होते. तर काही गावात सातव्या नवव्या आणि पंधराव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. मुलांसारखाच ज्येष्ठांमध्ये एकाच हा उत्साह लहानपातळीवर पाहायला मिळतो.

गेल्यावर्षी बाजारात आलेल्या रंगांची विक्री मोठ्याप्रमाणात न होता नैसर्गिक (Natural) रंगांची विक्री सर्वाधिक झाली होती. यावर्षीही नैसर्गिक रंगांची विक्री गावागावात होत आहे. मात्र, शहरापर्यंत नैसर्गिक रंगाची विक्री होत नसल्याने शहरात (City) बाजारातील रंगांना जास्त मागणी असते. वास्को बाजार आज रंगाच्या (color) दुकानांनी सजून गेला. विविध प्रकारचे रंग, तसेच पिचकाऱ्या, टोप्या, मुखवटे विविध दरात उपलब्ध आहेत. रंगांच्या विक्रीस आज पासून सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT