Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans: ‘आरजी’ची प्रतिमा मलीन करण्याचा डाव : मनोज परब

भाजपची ‘बी’ टीम असतो तर त्‍या पक्षासोबत गेलो असतो

गोमन्तक डिजिटल टीम

Revolutionary Goans: आज गोवेकरांचा आवाज असणारा एकमेव पक्ष म्‍हणजे रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स (आरजी) आहे आणि तीच आमची ताकद आहे. आम्ही शिवसेनेसोबत जाणार ही अफवा असून आरजीची आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव आहे.

आम्ही जर भाजपची ‘बी’ टीम असतो, तर त्‍या पक्षासोबत गेलो असतो. आम्‍ही मंत्रिपद मिळविले असते, असे ‘आरजी’चे नेते मनोज परब यांनी सांगितले.

आरजी हाच भाजपचा गोव्यातील एकमेव विरोधक आहे. आमच्या आमदाराला विधासभेत बोलायला दिले जात नाही. जर आम्‍ही भाजपची ‘बी’ टीम असतो तर एवढा खटाटोप कशासाठी केला असता?

आरजी पक्ष सुरूवातीपासून स्वतंत्र आहे आणि पुढेही स्वतंत्र विचारधारेनेच पुढे जाईल. तो कुठल्याच पक्षाबरोबर युती करणार नाही. आम्ही यापूर्वीही कधीच कुठल्या पक्षासोबत युती केली नव्हती आणि यापुढेही करणार नाही, असे परब म्‍हणाले.

अडसूळ यांना कधीच भेटलेलो नाही

शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ हे आपल्याला भेटल्याचे आणि आपण वारंवार महाराष्ट्राच्‍या मुख्यंमत्र्यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयात जात असल्‍याचे बोलले जात आहे. आम्ही केवळ एकदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो.

कधीच आजतागायत अडसूळ यांना भेटलेलो नाही. जर अडसूळ आणि माझी एकदा तरी भेट झाली असेल तर त्यांनी फोटो दाखवावेत. अडसूळांसारख्या चिरीमिरी नेत्यांना आपण भेटत नसतो. त्यामुळे असले घाणेरडे राजकारण सोडून द्या, असा सल्ला परब यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT