Traffic In Panjim: सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात गोव्यात आलेले पर्यटक, मांडवी नदीच्या बाजूने रस्त्यावर कसिनो कार्यालयासमोर पार्किंग केलेल्या टॅक्सी व स्वातंत्र्यदिनानिमित्त जुन्या सचिवालयाकडील पणजीत प्रवेश करणारा रस्ता बंद ठेवण्यात आल्याने पणजीतील सर्व रस्ते चक्काजाम झाले होते. दिवसभर ही स्थिती कायम होती.
पणजी कदंब बसस्थानकापासून ते शहरातील सर्व रस्त्यांवर लांबचलांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बसस्थानकापासून ते जुन्या सचिवालयापर्यंतचे अंतरासाठी वाहन चालकांना तासभर रांगेत राहण्याची पाळी आली. वाहतूक पोलिस असूनही त्यांची तारांबळ उडत होती.
पणजीत संध्याकाळनंतर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्व रस्त्यांवर वाहतुकीचा फज्जा उडाला. वाहतूक पोलिस ठिकठिकाणी विविध कामासाठी तैनात करण्यात आले आहेत, मात्र वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसून आले. पणजी बसस्थानकापासून ते जुने सचिवालयपर्यंत वाहनांचा रांगा लागल्या होत्या.
पोलिसांची धावपळ!
गस्तीवरील पोलिस वाहनेही या वाहतुकीच्या कोंडीत अडकल्याने पोलिसांची धावपळ झाली. पणजी शहरातील सर्व रस्त्यांच्या बाजूने वाहनांची पार्किंग केल्याने एकामागोमाग एकच वाहन रस्त्यावरून पुढे सरकत होते. रात्री 9 वाजेपर्यंत ही वाहतुकीची कोंडी सुरूच होती. वाहतूक पोलिस ही कोंडी सोडवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत होते, मात्र वाहनांच्या लागलेल्या रांगा कमी होत नव्हत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.