Madgaon Municipality Recruitment Dainik Gomantak
गोवा

Madgaon Municipality Recruitment: वशिल्याच्या तट्टूंसाठीच भरती प्रक्रिया, विरोधी नगरसेवक आक्रमक; पालिकेची नोकरभरती पुन्‍हा वादात?

Madgaon Municipality’s LDC Recruitment: मडगाव पालिकेने ११ एलडीसीसह अन्‍य दोन जागा भरण्‍यासाठी प्रक्रिया सुरू केली असून ही प्रक्रिया वादात सापडण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मडगाव पालिकेने ११ एलडीसीसह अन्‍य दोन जागा भरण्‍यासाठी प्रक्रिया सुरू केली असून ही प्रक्रिया वादात सापडण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. एकाबाजूने विरोधकांनी काही नगरसेवकांना आपल्‍या वाशिल्‍याचे तट्‍टू भरण्‍यासाठी ही प्रक्रिया सुरू केल्‍याचा आरोप केला आहे,

तर नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनी हे सर्व आरोप खोडून कर्मचाऱ्यांअभावी पालिकेच्‍या कामाचा खोळंबा होतो, असा आरोप जे कोण करत आले आहेत, तेच आता या भरतीला विरोध करतात ही आश्‍चर्याचीच गोष्‍ट, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

मडगाव पालिकेने ११ एलडीसीसह एक साईट सुपरवायझर आणि एक सहाय्‍यक गवंडी अशा एकूण १३ जागा भरण्‍यासाठी जाहिरात दिली असून याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली. अर्ज करण्‍यासाठी ११ नोव्‍हेंबरपर्यंत मुदत आहे. ११ एलडीसीच्‍या पाच जागा खुल्‍या गटासाठी असून प्रत्‍येकी दोन जागा ‘ओबीसी’ व ‘एसटी’साठी तर प्रत्‍येकी एक जागा आर्थिक दुर्बल आणि दिव्‍यांगांसाठी राखीव आहे, तर दोन पदे खुल्‍या गटासाठी आहेत.

मागच्‍या वर्षी टीका झाल्यामुळे नंतर ही पूर्ण प्रक्रियाच रद्द झाली होती. पुन्हा प्रक्रिया सुरू झालीय,पण यातील अन्‍य सर्व पदासाठी कोंकणीचे ज्ञान सक्‍तीचे असताना ‘साईट सुपरवायझर’साठी कोंकणीची अट ठेवलेली नाही. यामुळेही विरोधकांनी मडगाव पालिकेला लक्ष्‍य केले आहे.

त्यांना नियम माहीत नाही का?

मडगावचे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनी, सर्व आरोप फेटाळून लावले. साईट सुपरवायझर पदासाठी कोकणीची अट का शिथिल केली असा प्रश्‍न विचारला असता, पालिकेच्‍या भरती नियमात या एका पदासाठी ही अट ठेवलेली नाही, त्‍यामुळेच आम्‍ही ही अट घातलेली नाही.

जे कोण हा आरोप करतात ते स्‍वत: पूर्वी नगराध्‍यक्ष होते. त्‍यांना या नियमाची माहिती नाही का? असा सवाल करून पुन्हा असे आरोप झाल्‍यास त्‍यांना सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा दिला.

एकाच पदासाठी अट शिथिल का?

शॅडो कौन्‍सिलचे अध्‍यक्ष सावियो कुतिन्‍हो यांनी एकाच पदासाठी ही अट का शिथिल केली, असा सवाल केला. प्रभव नायक यांनी, दोन दिवसांपूर्वी मुख्‍यमंत्र्यांनी सर्व गट ‘क’ मधील कर्मचाऱ्यांची निवड आयोगामार्फत केली जाईल, असे सांगितले, पालिका ११ एलडीसीची थेट कशी भरती करते, असा सवाल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT