Mopa International Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa International Airport: ‘टॅक्सी स्टॅण्ड’चा प्रश्नी महत्वाची बातमी! टॅक्सी स्टँडबाबत मुख्यमंत्र्यांनी...

ताम्हणकर ः मुख्यमंत्री, वाहतूकमंत्र्यांचे सहकार्य

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa International Airport मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेडणे तालुक्यातील युवकांना टॅक्सी स्टॅंड मिळावे, यासाठी गेल्या नोव्हेंबरपासून आम्ही गांवागांवात जनजागृती करण्यासाठी बैठका घेतल्या.

धरणे आंदोलन केले, वाहतूक खाते, सरकारला याबाबत निवेदन दिले. या त्यांच्याबरोबर वेळोवेळी बोलणी केली व आमच्या मागण्यांची बाजू मांडली.

या सर्वाची फलनिष्पत्ती म्हणजे सरकारने आमची मागणी मान्य केली असून येत्या दहा पंधरा दिवसात टॅक्सी स्टॅंड अधिसूचित करून टॅक्सी स्टॅंडचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

ताम्हणकर म्हणाले, टॅक्सी स्टॅंड बाबतीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चांगले सहकार्य केले. मंत्री माविन गुदिन्हो यांनीही हा प्रश्‍न गंभीरपणे घेतला. आमदार आर्लेकर यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांकडे पोचविला.

त्यामुळे टॅक्सी स्टँडबाबत नवा आदेश काढला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी 300 जणांच्या नावांची शिफारस केली आहे. हे टॅक्सी स्टॅंड पेडणे तालुक्यातील बॅच धारकांसाठी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT