Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : युवासभेत विद्यार्थ्यांनी मांडल्या जनतेला भेडसावणाऱ्या समस्या

Mapusa News : या सभेस माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर आणि मान्यवर उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News :

म्हापसा, गणेशपुरी-म्हापसा येथील ‘विद्या भारती’ संचलित श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक युवासभा नुकतीच झाली. या सभेत विद्यार्थ्यांनी पालिका व पंचायत क्षेत्रांमध्ये जनतेला भेडसावणाऱ्या समस्या प्रामुख्याने मांडल्या.

या सभेस माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर आणि मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थिनी राजश्री हड्डीमनी हिने पालिका क्षेत्रातील, निदा खान हिने काणका-वेर्ला, तर नफिसा जमादार हिने आसगाव पंचायत क्षेत्रातील समस्या मांडल्या. विशेष म्हणजे, या समस्या सोडवण्याचे उपायही त्यांनी सुचविले.

प्रिया मिशाळ आणि डॉ. नूतन बिचोलकर यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनविण्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा युवासभेचे आयोजन केल्याबद्दल विद्यालयाचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

प्राचार्य गजानन मांद्रेकर यांनी युवासभेचा समारोप केला. संयोजक नेहा मडकईकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आचार्य शिल्पा पै पाणंदीकर यांनी मान्यवरांचा परिचय केला, तर आचार्य श्रद्धा केपेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT