Vat Purnima  Dainik Gomantak
गोवा

Vat Purnima 2023: मानकुरादचा भाव वधारला; पूजेचे साहित्यही महागले

दीड हजार रुपये डझन : वटपौर्णिमेच्या पूजेसाठी फळ टोपलीसह पूजेचे साहित्यही महागले

गोमन्तक डिजिटल टीम

Vat Purnima वटपौर्णिमा सणानिमित्त फळांना मोठी मागणी असते. फळांची टोपली करून ती सुवासिनींना भेट दिली जाते. त्यामुळे शुक्रवारी पणजी मार्केटमध्ये फळे खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

मात्र, 15 दिवसांपूर्वी 800 रुपये डझन मिळणाऱ्या मानकुराद आंब्याचे दर चांगलेच वधारले. चांगल्या आकाराचा मानकुराद शुक्रवारी 1,500 रुपये डझन या दराने विकला जात होता. इतर फळेही महागल्याने सुवासिनींना यंदा महागाईची झळ सोसावी लागली.

वटपौणिमेमुळे मानकुरादच्या दरात वाढ झाली. मागणीच वाढल्याने दर वाढविल्याचे पणजी बाजारातील एका विक्रेत्याने सांगितले. मानकुरादसह हापूस, केसरी, शेंदुरी, मालदेस व इतर आंब्यांचे दर चढेच होते.

वटपौर्णिमा सणानिमित्त फळांना मोठी मागणी असते. फळांची टोपली करून ती सुवासिनींना भेट दिली जाते. त्यामुळे शुक्रवारी पणजी मार्केटमध्ये फळे खरेदीसाठी झुंबड उडाली होती. मात्र, १५ दिवसांपूर्वी ८०० रुपये डझन मिळणाऱ्या मानकुराद आंब्याचे दर चांगलेच वधारले.

चांगल्या आकाराचा मानकुराद शुक्रवारी १,५०० रुपये डझन या दराने विकला जात होता. इतर फळेही महागल्याने सुवासिनींना यंदा महागाईची झळ सोसावी लागली.

वटपौणिमेमुळे मानकुरादच्या दरात वाढ झाली. मागणीच वाढल्याने दर वाढविल्याचे पणजी बाजारातील एका विक्रेत्याने सांगितले. मानकुरादसह हापूस, केसरी, शेंदुरी, मालदेस व इतर आंब्यांचे दर चढेच होते.

डिचोलीत फणस, अननस दाखल

वटपाैर्णिमेच्या पूर्वसंध्येला डिचोली बाजारात रसाळ फणस 100 ते 150 रुपये नग, तर कापा फणस आकाराप्रमाणे 200 ते 350 रुपये नग या दराने विकले जात होते.

वडाची फांदी 20 रुपयांना एक, तर वडाची पानेही बाजारात दाखल झाली आहेत. आकाराप्रमाणे 50 ते 100 रुपये एक नग असे अननसांचे दर आहेत. यंदा बाजारात दोऱ्याचे बंडल 50 रुपये व इतर पूजेचे साहित्यही बरेच महागले होते.

पंधरा दिवसांत दुप्पट वाढ

20 मे दरम्यान पणजी बाजारात 800 रुपये प्रतिडझन या दराने मानकुराद आंब्यांची विक्री केली जात होती. तसेच इतर आंबे 600 ते 700 रुपये प्रतिडझन दराने विकले जात होते. शुक्रवारी अचानक दीड हजार रुपये दराने मानकुराद विकला जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला चाट लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT