Goa Fish Market Daink Gomantak
गोवा

Fish Prices In Goa : राज्यात मासळीचे दर महागले! पापलेट हजार, तर इसवण आठशे रुपये किलो

हॉटेलमध्ये दरवाढीची शक्यता

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात मासळीच्या दरात वाढ झाली असून इसवण सातशे ते आठशे, तर पापलेट हजार रुपये किलो झाला आहे. गेल्या आठवड्यात दीडशे रुपये किलो दराने मिळणारे बांगडे आता 200 रुपये किलो, तर मोठ्या आकाराचे बांगडे 300 रुपये किलो दराने विकले जात होते.

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या बांगड्याचा दरही म्हणजे सर्वसामान्यांच्या चवीवर विरजणच ठरत आहे.

इसवण आठशे, तर पापलेट १ हजार रुपये किलो दराने विकला जात आहे. लेपो २५० -३०० रुपये, सुंगठे (कोळंबी) आकाराप्रमाणे ३०० ते ५०० रुपयांनी विकली जात आहेत. तारली देखील १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात आहेत. आज पणजी मासळी बाजारात इसवण, कर्ली, लेपो, माणकी, खुबे, कोळंबी, समुद्री खेकडे मुबलक प्रमाणात विक्रीस उपलब्ध होतेे. मासळी खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ अधिक होती.

हॉटेलमध्ये दरवाढीची शक्यता

मासळीचे हुमण, फिश फ्रायचा आस्वाद चाखण्यासाठी अनेक खवय्ये तसेच पर्यटक गोव्यात येतात. मात्र, वाढत्या मासळीच्या दरामुळे मासळी प्लेटच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणाला तळलेली मासळी आवडते, तर कोणाला हुमणातली, कुणाला इसवणाची पोस्ता आवडतात, तर कुणाला प्रॉन्स फ्राय. मात्र, काहींना तर दररोजच्या जेवणात मासळी लागतेच लागते.

अशावेळी मध्यमवर्गीयांना देखील ताज्या मासळी व्यतिरिक्त सुक्या खाऱ्या बांगड्यांवर दिवस ढकलावे लागत आहेत. येणाऱ्या काळात मासळीचा तुटवडा जाणवल्यास दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाजारात स्वच्छतेचा अभाव

पणजी मासळी बाजाराची दुरवस्था झालेली आहे. या मार्केटचे नव्याने बांधकाम अथवा डागडुजी करण्याची गरज आहे. त्यासोबत मासळी बाजार, मटण दुकाने वेगवेगळ्या ठिकाणी व सुस्थितीत तसेच कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी योग्य यंत्रणा असणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT