Devendra Fadnavis & Sanjay Raut Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'पोर्तुगिजांच्या पचनी पडला नाही गोवा' तर फडणवीसांच्या काय?

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलच गाजत आहे. भाजप (BJP) आणि राज्यात सत्तेत असणारा शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलच गाजत आहे. भाजप आणि राज्यात सत्तेत असणारा शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. मनी लॉंड्रीग प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते नवाब मलिक (Nawab Malik) ईडी कोठडीत आहेत. (The Portuguese did not understand Goa but Devendra Fadnavis did not understand Goa said Sanjay Raut)

दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील अनेक दिग्गज नेते भ्रष्टाचारात अडकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा ठाकरे सरकारमधील नेत्यांवरील विश्वास कमी होत चालला आहे. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळे आता मिशन महाराष्ट्र असल्याचा उल्लेख भाजप नेते करु लागले आहेत. महाराष्ट्रात भाजप 2024 मध्ये स्वबळावर सत्तेत येणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) या विधानावर आणि गोव्यात (Goa) भाजपच्या विजयावर राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश संपादन केले. यावेळी नागपूरमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले, ''गोवा विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशामुळे महाराष्ट्रातील जनतेचा भारतीय जनता पक्षावरील विश्वास वाढला आहे. महाराष्ट्रातील विद्यमान ठाकरे सरकार हे घोटाळेबाजांचे सरकार आहे. रोज नव नवीन घोटाळे आणि गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे हे सरकार कोडींत अडकत चालले आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात पुरावे देखील मी वेळ आली की दाखवणार आहे. भाजप गोव्यातील घवघवीत यशानंतर महाराष्ट्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पुढे 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.''

फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या विश्वासावर राऊत म्हणाले

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले, ''विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोवा जिंकून आले आहेत. त्यामुळे त्यांचे मनोबल चांगलेच वाढले आहे. परंतु गोवा नक्की काय आहे ते त्यांना लवकरच कळेल, कारण पोर्तुगिजांनाही गोवा नक्की काय आहे ते कळाला नव्हता. त्याचबरोबर इंग्राजांनाही गोवा लवकर समजला नाही. त्यानंतर देशातील अनेक राजकीय पक्षांना गोवा कळला नाही. त्यामुळे लवकरच माझे मित्र आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना गोवा काय आहे ते लवकरच समजेल. गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्यामुळे आत्मविश्वास वाढला असेल, पण त्यांनी प्रयत्न करावे. त्याचबरोबर त्यांनी राजकीय कार्यात स्वतःला वाहून घ्यावे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT