Court | Goa Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa News : मंदार सुर्लकर खून प्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळली

लवकर मुक्त करण्यासाठी याचिका दाखल केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : वास्को येथील मंदार सुर्लकर खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या शंकर तिवारी याने लवकर मुक्त करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

आरोपी शंकर तिवारी याने तुरुंगातून लवकर मुक्त करावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर मंदारचे वडील दीपक सुर्लकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून विरोध केला होता. या प्रकरणी खंडपीठाने आरोपीची याचिका आहे.

वास्कोतील मंदार सुर्लकर याचा 2006 मध्ये अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी आरोपी रोहन पै धुंगट, नफियाज शेख, शंकर तिवारी, जोविता रायन पिंटो व अल सलेटा बेग यांच्याविरोधात भा.दं.सं.च्या कलम 120 (बी), 364, 302 आणि बाल कायद्याचे कलम 8 नुसार गुन्हा दाखल करून बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणी बाल न्यायालयाने 23 जून 2014 रोजी चारही आरोपींना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर अल सलेहा बेग हा माफीचा साक्षीदार बनल्यामुळे त्याला मुक्त केले. या प्रकरणी चारही आरोपींनी गोवा खंडपीठात बाल न्यायालयाच्या निवाड्याला आव्हान दिले होते. त्यावर खंडपीठाने 4 मार्च 2019 रोजी चौघांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.

बाल न्यायालयाने आरोपींना लवकर मुक्त करण्यास नकार दिल्यामुळे सरकारने प्रस्ताव फेटाळला होता. वरील दोन्ही आदेशांना चारही आरोपींनी गोवा खंडपीठात आव्हान दिले. चारही आरोपींनी वास्तविक 14 वर्षे तुरुंगवास भोगला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे खंडपीठानेही त्यांना लवकर मुक्त करण्यास नकार दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT