53rd IFFI 2022
53rd IFFI 2022 Dainik GomantaK
गोवा

53rd IFFI 2022: ''इफ्फी'ने भारतीय चित्रपट सृष्टीची विश्वासार्हता वाढवली'

Sumit Tambekar

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53 व्या आवृत्तीला आजपासून गोव्यात आज पार पडाला . या पार्श्वभूमीवरकेंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, इफ्फी आता जगातील कलाकारांना आकर्षित करणारे व्यासपीठ बनले आहे. या कार्यक्रमादरम्यान अनेक दिग्गजांना पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले.

(The opening ceremony of 53rd edition of the International Film Festival of India at Goa)

या चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या चित्रपटाचे प्रदर्शन मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी बोलताना मंत्री ठाकूर म्हणाले की, हे एक असे व्यासपीठ आहे, ज्याच्यामध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी देशातील नाही तर जगभरातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांना संधी मिळणार आहे. यामध्ये चित्रपट, लघुपट, आणि इतर घटकांचा समावेश आहे.

देशातील 75 सर्जनशिल कलाकरांची निवड करणार

या कार्यक्रमाचा भाग म्हणून देशातील 75 सर्जनशिल कलाकरांची निवड केली जाणार आहे. ज्याच्यामध्ये काश्मिरपासून ते केरळच्या पर्यंतच्या युवा कलाकारांची निवड होत असते. 18 ते 29 वर्षापर्यंतच्या युवा कलाकारांना संधी मिळते असे ते म्हणाले. यामुळेच तर देशातील सर्जनशिल कलावंत आपल्या कलेला न्याय देऊ शकतील असे ही ते म्हणाले.

या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, सर्व चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, सिनेकलाकार यांना नव्या चित्रपट निर्मीतीसाठी गोव्यात यावे. गोवा सरकार आपल्याला संपुर्ण सहकार्य करेल ज्याचा उपयोग आपल्या नवे प्रयोग करता येतील अन् गोव्याच्या पर्यटन आणि इतर उद्योगांना ही चांगले दिवस येतील.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्गजांचा सन्मान

मेगास्टार चिरंजीवी यांना ''Indian film personality of the year 2022'' पुरस्कार प्रदान

मुख्य परीक्षकांचा केला सन्मान

दिग्गज अभिनेत्यांचा केला सत्कार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT