गोवा

Goa Comunidade: शेडचे बांधकाम पुढील निर्णयापर्यंत राहणार बंद

Goa Comunidade: सुनावणी तहकूब: रामतळे, साईनगरातील ग्रामस्थांचा आक्षेप कायम

दैनिक गोमन्तक

Goa Comunidade: रामतळे येथे उभारल्या जाणाऱ्या एमआरएफ (मटेरियल रिकव्हरी फॅसिलीटी) शेडचे बांधकाम थांबविण्याचे निर्देश उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी मध्यंतरी दिले होते. त्यानुसार, आज मंगळवारी प्रशासकांनी सुनावणीवेळी पुढील निर्णयापर्यंत शेडचे बांधकाम बंदच ठेवण्याचा आदेश यापुढे लागू राहील, असे स्पष्ट केले.

येत्या ४ जानेवारीपर्यंत ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. हळदोणा पंचायतीकडून सर्व्हे क्र. ३४३/१६मध्ये एमआरएफ शेड उभारणीचे काम हाती घेण्यात आलेले. मात्र, या कामास रामतळे तसेच साईनगरमधील ग्रामस्थ आणि रामतळेश्वर देवस्थानने आक्षेप घेत यास जोरदार विरोध केला आहे. त्यानुसार, रामतळे रहिवाशांनी उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांकडे लेखी तक्रार दिल्यानंतर, प्रशासकांनी २७ डिसेंबर २०२३ रोजी, शेडचे बांधकाम तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले होते आणि २ जानेवारीला आपल्या कार्यालयात दोन्ही उभय पक्षास सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

या निर्देशानुसार मंगळवारी (ता.२) दुपारी उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक सागर गावडे यांच्यासमोर सुनावणीदरम्यान, दोन्ही पक्षांनी युक्तिवाद करीत आपापले दावे-प्रतिदावे सादर केले. याविषयी माहिती देताना रामतळेश्वर देवस्थानचे प्रतिनिधित्व करणारे वकील अ‍ॅड. विनायक परब म्हणाले, कोमुनिदाद प्रशासकांसमोर सुनावणीदरम्यान आम्ही आणि आमच्या विरोधी पक्षाने आपली बाजू मांडली.

यावेळी आम्ही या एमआरएफ शेडमुळे देवस्थान व तेथील तळीचे होणारे प्रदूषण तसेच दुष्परिणामांविषयी प्रशासकांना माहिती दिली.

त्यानंतर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकत प्रशासकांनी पुढील निर्णयापर्यंत वरील शेडचे बांधकाम बंदच ठेवण्याचा आदेश यापुढे लागू राहील असे सांगितले आहे.

उद्या पुन्हा सुनावणी

याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या ४ जानेवारी सायंकाळी ४.४५वा. होईल. त्यादिवशी दोन्ही पक्षांना आपाले म्हणणे सादर करून गुणवत्तेवर युक्तिवाद करावे लागतील. त्यानंतर प्रशासक या प्रकरणी पुढील निर्णय देणार असल्याची माहिती परब यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT