P. S. Sreedharan Pillai Governor of Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: दुर्मीळ होणारी कावी कला टिकवून ठेवण्‍याची गरज

Goa Culture: राज्‍यपाल पिल्लई: लामगाव-डिचोली येथे केली कलेची पाहणी, घेतले देवतांचे दर्शन

दैनिक गोमन्तक

Goa Culture: गोवा हे विविधतेने नटलेले आणि समृद्ध वारसा असलेले राज्य आहे. मातीशी जोडलेल्या कावी कलेला मोठा वारसा आणि समृद्ध परंपरा आहे. दुर्मीळ होत चाललेल्या या कलेला उर्जिवास्थता मिळवून देतानाच भावी पिढीच्या माहितीसाठी ही कला वृद्धिंगत होण्याची गरज आहे.

असे मत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी शुक्रवारी डिचोली येथे बोलताना व्यक्त केले. मोठा वारसा असलेल्या डिचोली शहरातील लामगाव येथील आनंद देसाई यांच्या घरातील कावी कलेचे निरीक्षण केल्यानंतर राज्यपाल पिल्लई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यपाल श्री. पिल्लई यांनी पत्नी डॉ. रिटासह ऐतिहासिक वारसा असलेल्या देसाई यांच्या संपूर्ण वाड्यातील कावी कलेची पाहणी केली. संजीव सरदेसाई यांनी राज्यपालांना कावी कलेविषयी माहिती दिली. यावेळी देसाई कुटुंबातील सर्व सदस्य तसेच गोमंतकातील युवा कावी कलाकार सागर नाईक मुळे, राज्यपालांचे खास अधिकारी मिहीर वर्धन उपस्थित होते.

राजभवनावर कार्यशाळा

कावी कलेचा प्रसार आणि कलेला प्रोत्साहन मिळून ही कला पुढे यावी. या हेतूने राजभवनवर कावी कलेविषयी चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १४ ते १७ फेब्रुवारीपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे, अशी माहिती राज्यपाल पिल्लई यांनी दिली.

गोशाळा, औषधी बाग आदी राजभवनावरील उपक्रमांविषयी त्यांनी माहिती देऊन विविध उपक्रम राबविण्यामागील उद्देश स्पष्ट केला. गरजूसह समाजाची सेवा करणे हे कर्तव्य आहे. कर्क आणि डाएलिसिस रुग्णांना यापूर्वी केलेल्या आर्थिक मदतीचे त्‍यांनी यावेळी समर्थन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

FDA Raid: ग्राहकांच्या तक्रारी, 'एफडीए'ची हजेरी; मडगाव, फातोर्डा, वेर्णा येथील अस्वच्छ आस्थापनांवर कारवाई

Widow Practice Prevention Law: विधानसभेत दिलेला 'विधवा प्रथा प्रतिबंधक कायद्या'चा शब्द अजूनही कागदावरच

Acid Attack Goa: 'न्यायव्यवस्था न्याय देऊच शकत नाही, आपल्यालाच करावं लागेल' चित्रपटांनी रुजवलेली मानसिकता धारगळ ॲसिड हल्ल्याला जबाबदार?

Banda Accident: बांदा पुलावर मध्यरात्री थरार! कार ओहोळात कोसळली, काहीजण अडकल्याची भीती; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू

SCROLL FOR NEXT