National Hurricane Risk Mitigation Project dainik gomantak
गोवा

शाळा पाडल्या; मात्र राष्ट्रीय चक्रीवादळ धोका उपशमन प्रकल्प अपूर्णच

नगर्से येथील प्रकल्प पटसंख्ये अभावी बंद पडलेल्या शाळेची इमारत पाडून प्रकल्पाची सुरूवात

दैनिक गोमन्तक

काणकोण : राष्ट्रीय चक्रीवादळ धोका उपशमन प्रकल्प गेली चार वर्षे रेंगाळत पडले आहेत. काणकोणात नगर्से, चापोली व महालवाडा-पैगीण असे तीन प्रकल्पाची उभारणी एप्रिल २०१८ मध्ये सुरू करण्यात आली होती. सप्टेंबर २०१९ पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा होती. दरम्यान काणकोणात २००९ मध्ये पूर आला त्यावेळी गालजीबाग, तळपण नदीच्या (Talpan River) किनाऱ्यालगत असलेल्या रहिवाशांना स्थलांतर करावे लागले होते. या तीन्ही प्रकल्पासाठी जागतीक बँकेने अर्थसहाय्य देऊन राज्य सरकारच्या जलस्त्रोत खात्यातर्फे आपत्ती व्यवस्थापनाखाली या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. (The National Hurricane Risk Mitigation Project has not been completed in four years)

पालिका क्षेत्रातील नगर्से येथील प्रकल्प पटसंख्ये अभावी बंद पडलेल्या शाळेची इमारत पाडून उभारण्यात येत आहे. तर पैगीण पंचायत क्षेत्रातील महालवाडा येथील प्रकल्प चालू स्थितीत असलेली सरकारी प्राथमिक शाळेची इमारत पाडून उभारण्यात आला आहे. मात्र जागतीक बँकेचे (World Bank) अर्थसहाय्य असताना हे प्रकल्प पूर्ण होण्यास निर्धारित वेळेपेक्षा तीन वर्षाचा अतिरिक्त कालावधी लागला आहे.

महालवाडा-पैगीण येथील शाळेचे वर्ग भाड्याच्या खोलीत

पैगीण पंचायत (panchayat poinguinim) क्षेत्रातील महालवाडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाची (primary school) इमारत पाडून त्याजागी आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र त्यामुळे गेली चार शैक्षणीक वर्षे या प्राथमिक विद्यालयाचे वर्ग एका भाड्याच्या इमारतीत चालविले जातात. येथील हा प्रकल्प 2 कोटी 83 लाख 71 हजार 430 रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. प्रकल्प उभारण्यास झालेली दिरंगाई पाहता या खर्चात नक्कीच वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला केवळ दोन दिवस बाकी; यात्रेकरूंच्या राहण्याची, पार्किंगची तयारी कुठवर आली?

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT