Olive Ridley Turtle Dainik Gomantak
गोवा

Goa Beaches: 'या' दोन ठिकाणी संगीत महोत्सवाला केली जाणार मनाई, 'हे' कारण आलं समोर...

उच्च न्यायालयाने सुनावणीत प्रदूषण निमंत्रण मंडळाची बाजू उचलून धरली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Beaches मोरजी आणि मांद्रे हे दोन किनारे कासव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने किनारपट्टीपासून 500 मीटर अंतरात संगीत वाजविण्यावर पूर्णतः बंदी येणार आहे.

या क्षेत्रात यापुढे संगीत महोत्सव आयोजित करण्यास मनाई केली जाणार असल्याची माहिती ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी आज दिली.

तसेच कासव संवर्धनाला अडथळा ठरणाऱ्या 32 आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

सध्या किनाऱ्यावर वाढलेल्या विविध गतविधींमुळे कासव संवर्धन उपक्रम धोक्यात येण्याची भीती यापूर्वीच काही संस्थांनी व्यक्त केली होती. उत्तर गोव्यातील मोरजी किनारा ऑलिव्ह रिडले कासवांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित मानला जातो.

किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची गर्दी पाहून येथे अनेक आस्थापने निर्माण झाली. त्‍यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने नसल्याने नोटीस बजावण्‍यात आली.

त्याविरोधात उच्च न्यायालयाने सुनावणीत प्रदूषण निमंत्रण मंडळाची बाजू उचलून धरली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 32 आस्थापने सील केली आहेत.

आणखी आस्‍थापनांची होणार तपासणी:-

प्रदूषण नियंत्रण मंडळ आणखी काही आस्‍थापनांची तपासणी करून मंडळाचा परवाना घेतला आहे की नाही हे पडताळेल. मोरजी आणि मांद्रे हे कासव संवर्धनासाठी संरक्षित किनारे आहेत.

तेथे भरतीरेषेपासून 500 मीटर क्षेत्रापर्यंत सायलेंट झोन असल्याने कोणतेही संगीत किंवा कर्णकर्कश आवाजाचे कार्यक्रम करता येणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

Panaji Traffic Congestion: कॅसिनो अन् बेशिस्त पार्किंगमुळे पणजीची कोंडी! गोवा खंडपीठाचे वाहतूक पोलिसांना महत्त्वाचे निर्देश

October Heatwave: 41.4 अंश तापमानाने म्हापसा तापला? शहरातील उष्णतेच्या नोंदींकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

October Temperature: पारा चढला, गोवा तापला! 37.2 अंश तापमानाची नोंद; उष्णतेमुळे यलो अलर्ट जारी

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

SCROLL FOR NEXT