Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality: मडगाव शहरातील ठिक ठिकाणची शेकडो बेवारस वाहने नगरपालिका हटविणार

Margao Municipality: मडगाव नगरपालिकेतील नगरसेवकांनी ही वाहने ताबडतोब हटविण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Margao Municipality: मडगाव शहरात अनेक ठिकाणी शेकडो बेवारस वाहने पडून आहेत. काही वाहनांचे पत्रे, टायर खराब झाले आहेत. या वाहनांमुळे शहराच्या सौंदर्यालाही बाधा पोहोचते. आता मडगाव नगरपालिकेतील नगरसेवकांनी ही बाब नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या लक्षात आणून दिली असून ही वाहने ताबडतोब हटविण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की, ही वाहने हटविताना काही नियम तसेच कायदेकानून पाळावे लागतात. प्रत्येक गाड्यांचे नंबर नोंद केले असून प्रथम त्या गाड्यांच्या मालकांना पत्रे पाठवून ती हटविण्याची विनंती केली जाईल. जर प्रतिसाद मिळत नसेल तर मात्र नगरपालिकेला ती हटवावी लागतील.

मात्र, नेमकी कोणत्या दिवशी किंवा तारखेला ती हटविणार हे आताच निश्र्चितपणे सांगता येणार नाही. ही वाहने मुख्य रस्त्यावर नाहीत; पण आतील भागातील रस्त्यांवर आहेत. तरीही ती हटवावीच लागतील.

यादीत 98 वाहने

एका महिन्यापूर्वी आपण हा प्रश्र्न उपस्थित केला होता. या वाहनांबद्दल नगरपालिकेने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासन संचालनालयाला पत्र लिहून त्यांची परवानगी मागितली आहे. शहरात जवळ जवळ 98 बेवारस वाहनांची यादी तयार केली आहे, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले.

महेश आमोणकर, नगरसेवक-

आपल्या प्रभागात अशी कित्येक वाहने पडून आहेत. याचा लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे आपण नगराध्यक्ष व मुख्याध्याकाऱ्यांना पत्र लिहून ती हटविण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पुलिसांक काय Value ना?", नरकासुर मिरवणुकीत आवाज वाढवला, मंडळाने घातली हुज्जत; पोलिसांनी घेतली कडक ऍक्शन

Narkasur in Goa: नरकासुर स्पर्धेत राडा! काणकोणात मिरवणुकीच्या रस्त्यावरून दोन गट भिडले; जोरदार हाणामारी

Viral Video: 'देसी' आयडिया जिंदाबाद! सुरी मिळाली नाही म्हणून पठ्ठ्यानं कात्रीनं कापलं सफरचंद, व्हिडिओ पाहून म्हणाल 'व्वा!'

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

Quelossim: समुद्र किनाऱ्यावर भरला ‘दिवाळी बाजार’! केळशी पंचायतीचा अभिनव उपक्रम; स्थानिकांसह पर्यटकांनीही घेतला लाभ

SCROLL FOR NEXT