Sunburn Festival Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Camurlim Local Citizens Opposed Sunburn Festival 2024: कामुर्ली गावात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम) आयोजनासाठी सनबर्नने कामुर्ली कोमुनिदादकडे जागेची मागणी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn Festival News: कामुर्ली गावात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम) आयोजनासाठी सनबर्नने कामुर्ली कोमुनिदादकडे जागेची मागणी केली आहे. या प्रस्तावावर चर्चेसाठी येत्या रविवारी, ६ ऑक्टोबरला बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर, गावात कुठल्याही परिस्थितीत सनबर्नला मंजूरी देऊ नये, यासाठी स्थानिकांकडून गावात सनबर्न नको, या बॅनरखाली स्वाक्षरी मोहीम राबवली. आतापर्यंत हजारहून अधिक लोकांनी सह्या केल्या असून, रविवारच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयानंतर पुढील रणनीती व दिशा ठरवली जाईल, असे जागृत तसेच सक्रिय लोकांनी ठरवले आहे.

माजी सरपंच शरद गाड यांनी सांगितले की, गावात ध्वनीप्रदूषण व महोत्सवस्थळी कथित गैरप्रकार चालणाऱ्या फेस्टिव्हलना आमचा सदैव विरोधच असेल. आम्ही गावात स्वाक्षरी मोहीम राबवून लोकांच्या सह्या घेत आहोत. आतापर्यंत हजारपेक्षा अधिक लोकांनी या मोहिमेला पाठिंबा देऊन स्वाक्षरी दिली आहे. येत्या रविवारी कामुर्ली कोमुनिदादची बैठक होणार आहे. यात बैठकीत आम्ही दिशा ठरवणार आहोत. त्यामुळे आम्ही रविवारच्या बैठकीची प्रतीक्षा करत आहोत, असे गाड म्हणाले.

सदस्यांवर दबाव?

जे लोकप्रतिनिधी सनबर्न चांगला किंवा त्याचे समर्थन करतात, त्यांनी आपल्या मतदारसंघात सनबर्न न्यावा. सध्या गावातून लोकांचा आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे काही लोकप्रतिनिधी कोमुनिदादच्या सदस्यांना सनबर्नला पाठिंबा द्यावा, याकरिता संबंधितांवर राजकीय दबाव टाकण्याचे प्रयत्न करताहेत, असा आरोप गाड यांनी केला. दिल्लीत सहा हजार कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. हे ड्रग्स दिल्ली, मुंबई तसेच गोव्यात होणाऱ्या चार मोठ्या कॉन्सर्ट व संगीत महोत्सवात पुरवठा केला जाणार होता. विशेष म्हणजे काही लोकप्रतिनिधी महोत्सवात ड्रग्सचा वापर होत नाही, असे म्हणतात. मग वरील कारवाईविषयी संबधितांचे म्हणणे काय? असा सवाल शरद गाड यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

SCROLL FOR NEXT