Anjunem Dam at Kerim - Sattari (Goa) Dashrath Morajkar / Gomantak
गोवा

Anjunem Dam Water Level Falling: चिंता वाढली, 55 दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक; पाऊस न पडल्यास कपातीचं संकट

पाऊस वेळेवर न आल्यास पाणीटंचाईची शक्यता

दैनिक गोमन्तक डिजिटल

Anjunem Dam Water Level Falling: केरी - सत्तरीतील 93.2 मीटर क्षमता असलेल्या अंजुणे धरणातील पाण्याची पातळी यावर्षी एप्रिल महिन्यातच घटली आहे.

यावर्षी शेती बागायतींसाठी डिसेंबरऐवजी नोव्हेंबर महिन्यातच म्हणजे एक महिना अगोदरच पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केल्याने पाण्याची पातळी लवकर घटल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी पाणी पातळी 3.19 मीटर खाली गेल्यामुळे या जलाशयात आता केवळ 55 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे.

10 एप्रिल 2022 रोजी अंजुणे धरणातील पाण्याची पातळी 80.35 मीटर इतकी होती. यावर्षी ही पातळी 77.19 मीटर इतकी झाली आहे.

या स्थितीमुळे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या प्रारंभी पाण्याची टंचाई भासू शकते. सध्या या धरणात 77.19 मीटर म्हणजे 11 मिलियन क्युबिक मीटर इतके पाणी आहे.

तर गेल्यावर्षी याच दिवशी या धरणामध्ये 80.35 क्युबिक मीटर इतके पाणी होते. म्हणजेच 17.08 मिलियन क्युबिक मिटर पाणीसाठा होता. या धरणातील पाणीपातळी गेल्यावर्षीपेक्षा 3.19 मीटरने घटली आहे.

अंजुणे धरणातील पाणी वाळवंटी नदीत सोडले जाते. या पाण्यावर पडोसे व साखळी जलशुद्धीकरण प्रकल्प व अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये जलशुद्धीकरण प्रक्रिया होते. तिळारी धरणाच्या पाण्यावर अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प व आमठाणे धरण अवलंबून आहे.

विर्डी-महाराष्ट्रातील धरणामुळे वाळवंटी नदीच्या जलप्रवाहावर बराच परिणाम झालेला आहे. त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर होत आहे, असेही राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

९३.२ मीटर धरणाची क्षमता

८०.३५ मीटर इतकी गेल्यावर्षी १० एप्रिल रोजी पाणी पातळी

७७.१९ मीटर इतकी यंदाची १० एप्रिलची पाणी पातळी

३.१९ मीटरने पाण्याची पातळी उतरली.

५५ दिवस पुरणार इतकेच जलाशयात पाणी.

‘पाणी पातळी’चा अभ्यासच नाही!

अंजुणे धरणाच्या जलाशयाकडे जलस्रोत खात्याकडून आतापर्यंत दुर्लक्षच झाल्याने त्याची पाणी साठविण्याची क्षमता घटत चालली आहे. या धरणातील कमी होत असलेल्या पाण्याच्या पातळीवर जलस्रोत खात्याचा अभ्यासच नाही.

या जलाशयात बराच गाळ साचलेला आहे. या गाळामुळे जलाशयाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी होत चालली आहे, असे पर्यावरणवादी राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

"चार गावांचे स्थलांतर व पुनर्वसन करून अंजुणे धरण साकारण्यात आले होते. डिचोली व बार्देश तालुक्यांसाठी लागणाऱ्या पाण्याच्या पाण्याचा तो एक महत्त्वाचा दुवा आहे."

"परंतु आज हे धरण असुरक्षित बनत चालले आहे. अशीच स्थिती भविष्यातही राहिल्यास धरणातील पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा लवकरच उतरत राहील आणि त्याचे गंभीर परिणाम होतील."

- राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT