Leopard Death News Dainik Gomantak
गोवा

Leopard Death News: पुन्हा एकदा फासात अडकून मादी बिबट्याचा अंत, गेल्या 6 महिन्यांत शिकारीच्या प्रकरणांमध्ये वाढ

पोटाला केबलचा फास आवळला गेल्यामुळे झाला मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

Leopard Death News धारबांदोडा संजीवनी सहकारी कारखान्याजवळ सुरंगी फार्मच्या बागायतीत अज्ञातांनी लावलेल्या फासात अडकून बिबटा (मादी) मृत झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काही दिवसांपूर्वीही फासात अडकून एक बिबटा ठार झाला होता.

बोंडला प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक परेश परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञातांनी या ठिकाणी रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी केबलचा फास लावलेला होता. या फासात हा बिबटा अडकला. फासातून सुटका करण्यासाठी बिबट्याने पुष्कळ प्रयत्न केले.

मात्र, त्याच्या पोटाला केबलचा फास आवळला गेल्यामुळे मोठी जखम झाली. त्यामुळे जखमेवर माशा बसू लागल्या. सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात त्याने अखेर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता प्राण सोडला.

या ठिकाणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. ही घटना घडली ते ठिकाण वन विभागाच्या कुळे क्षेत्रात येत असल्याने उद्यापासून वन विभागातर्फे चौकशी करण्यात येणार आहे, असे वन अधिकारी रवी शिरोडकर यांनी सांगितले.

कुळेचे वन अधिकारी रवी शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धारबांदोडा राउंड फॉरेस्टर गोपाळ जल्मी यांनी या घटनेचा पंचनामा केला. त्याठिकाणी फास लावलेला लोखंडी खांब, केबल ताब्यात घेतली आहे तसेच बिबट्याचा मृतदेह धारबांदोडा कार्यालयात ठेवला आहे.

शुक्रवारी सकाळी बोंडला येथील वन विभागाचे डॉक्टर शवविच्छेदन करणार असून त्यानंतरच हा बिबटा फासात कधी अडकला, हे स्पष्ट होणार आहे.

‘त्या’ लोकांची चौकशी करा!

या भागात रानटी जनावरांची शिकार मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरातील बागायतीत मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीय लोक राहात आहेत. त्यांना शिकारीची कला अवगत आहे.

रात्री-बेरात्री ते बिनधास्तपणे जंगलात फिरत असल्याने या लोकांची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

वन खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष

गेल्या सहा महिन्यांत 10 हून अधिक बिबट्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या असून त्यापैकी बऱ्याच ठिकाणी रानटी जनावरे मारण्यासाठी फास लावल्याचे दिसून आले होते. या फासामध्ये हे बिबटे अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

वन खात्याचे या प्रकारांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून खात्याचे शिकारविरोधी पथक नक्की काय करते हे कळत नाही, अशी प्रतिक्रिया पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पालिकांच्या विकासाला चालना देणारे विधेयक विधानसभेत सादर, 'अ' वर्ग नगरपालिकांची सदस्य संख्या 25 वरून 27 होणार

Candolim Casino Raid: कांदोळीत कॅसिनोवर पोलिसांचा छापा, 'अंदर-बाहर' जुगार खेळताना 11 जणांना रंगेहाथ पकडलं

Goa: राज्‍यात तब्बल 1,14,840 पाळीव आणि मोकाट कुत्रे! 9,459 भटकी गुरे; पशुसंवर्धन खात्याची माहिती

Trump Tariffs India: ट्रम्प यांचा पुन्हा भारताला धक्का, आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची केली घोषणा

Goa Assembly Session: महसूलबुडव्या कंपन्यांचा खाण लिलावात सहभाग, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका

SCROLL FOR NEXT