desai wada Advoi Sattari 
गोवा

Goa: अडवई सत्तरीतील सिलिंडर स्फोटात घर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

अग्निशमन दलाचे निरीक्षक संतोष गावस (Santosh Gavas) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली.

दैनिक गोमन्तक

देसाईवाडा अडवई सत्तरी (desai wada Advoi Sattari) येथील प्रदीप गावकर यांच्या घरी सिलिंडरचा धमाका (cylinder spot) झाल्याने त्यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्याला मोठी आर्थिक नुकसान झाली आहे. सुदैवाने स्फोटाच्या वेळी घरात कोणीही नव्हता म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे घराला लागली आणि त्यानंतर घरात असलेला सिलिंडरचा आगीच्या भडक्यात फुटला झाला अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. जेव्हा ही शेजाऱ्याने पाहिल्यानंतर लगेच धावाधाव सुरू झाली आणि याची माहिती वाळपई (Walpai) अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर लगेचच दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन घराला लागलेल्या विजवण्यात यश मिळवले त्यामुळे आणखी हानी टळली. अग्निशमन दलाचे निरीक्षक संतोष गावस यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली.

स्पोर्टमुळे मोठी नुकसान

दरम्यान या धमक्यामुळे प्रदीप गावकर यांची मोठी आर्थिक नुकसान झालेली आहे. यामुळे आगीमुळे घराचे छप्पराचे वासे जळाले, मंगळूरी कौले खाली पडून फुटली. तसेच घरातील टी. व्ही., फ्रीज, टी व्ही स्टँड, शिलाई मशीन, कपडे, स्वयंपाक घरातील भांडी आदी साहित्याबरोबर नगद पैसे व प्रदीप गावकर याची महत्वाची कागदपत्रे जळली आहे. त्यामुळे त्याला मोठी आर्थिक नुकसान झाली आहे. दरम्यान या नुकसानीची तपशील केला नसल्याने नेमकी नुकसान समजली नाही. पण एकूण नुकसान लाखोंच्यावर असणार असे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येते.

मोठा अनर्थ टळला

श्री गावकर यांच्या इतर दोन भावाचे घर यांच्या घराला लागून होते. श्री गावकर यांच्या घरी आणखी एक सिलिंडर आणि दोन भावांच्या घरी 4 सिलिंडर होते. घराला लागलेल्या आग विजवण्यात यश मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. आग लागली तेव्हा शेजारी घरात मंडळी होती. त्यांना लगेचच बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घराच्या छपरावरून वीज वाहिनी

दरम्यान यांच्या घराच्या छपरावरून गावात जाणारी विजवाहिनी गेलेली आहे. या विजवाहिन्याच्या घश्रणाने शॉर्ट सर्किट होऊन घरला आग लागली असे मते व्यक्त होतात. दरम्यान त्यांच्या घरावरून जाणारी विजवाहिनी या नुकसानीला कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. दरम्यान ही विजवाहिनी काढून घराबाहेरून घ्यावी अशी मागणी त्याने यापूर्वी केलेली होती पण विजखत्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असल्याने वीज खाते जबाबदार असे येथे बोलले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT