Margao News Dacinik Gomantak
गोवा

Margao News: मडगावात वाढत्या गुंडगिरीला परप्रांतीय विक्रेतेच कारणीभूत

Margao News: नागरिकांचा पालिकेवर मोर्चा : आठ दिवसांत कारवाईची मागणी

दैनिक गोमन्तक

Margao News: मडगावात जी गुंडगिरी वाढली आहे त्‍यामागे शहरात बेकायदेशीररित्‍या रस्‍त्‍यावर बसून विक्री करणारे परप्रांतीय विक्रेतेच कारणीभूत आहेत. रविवारी (ता.१७) जो मडगाव स्‍मशानभूमीत दोघांवर जीवघेणा हल्‍ला करण्‍यात आला त्‍यामागेही हेच बेकायदेशीर विक्रेते जबाबदार होते.

या गुंडगिरीचे मूळ उपटून काढायचे असेल तर या बेकायदेशीर विक्रेत्‍यांवर कडक कारवाई करण्‍याची गरज असल्‍याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. आठ दिवसांत या सर्व बेकायदेशीर विक्रेत्‍यांना मडगावातून हटवा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी मडगावचे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांच्‍याकडे केली.

रविवारी दवर्ली-दिकरपालचे पंच साईश राजाध्‍यक्ष आणि मडगाव स्‍मशानभूमीत देखरेखीचे काम करणारे जयवंत फोंडेकर या दोघांवर खुनी हल्‍ला करण्‍यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्‍यात आली आहे. या घटनेचा निषेध करण्‍यासाठी सोमवारी नागरिकांनी मडगाव पालिकेवर मोर्चा आणला हाेता. त्‍यात भाजपचे नेते शर्मद रायतूरकर यांच्‍यासह मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर आणि मडगाव न्‍यू मार्केटचे अध्‍यक्ष

विनोद शिरोडकर यांचाही समावेश होता.

बेकायदेशीर शहाळी विक्री, रस्‍त्‍यावर बसून केली जाणारी मासेविक्री आणि बेकायदेशीर ठेले उघडून केली जाणारी चिकन विक्री याच गोष्टी मडगावातील गुंडगिरीचे मुख्‍य कारण आहेत. त्‍यांना काही राजकारण्‍यांचा आशीर्वाद आहे. त्‍यामुळेच आता त्‍यांची मजल स्‍थानिकांवर हात उगारण्‍याइतपत पोहोचली आहे. ही दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे यावेळी शर्मद रायतूरकर यांनी सांगितले. ‘चुन चुन करके मारेंगे’ ही भाषा यापुढे मडगावात चालू देणार नाही, असेही ते म्‍हणाले.

या विक्रेत्‍यांवर कारवाई करण्‍यासाठी आपण पालिका अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. मडगावात कुठे बेकायदेशीर विक्रेते आहेत त्‍यांची सूची तयार करण्यास सांगितले आहे. या विक्रेत्‍यांवर कारवाई करण्‍याची आपली तयारी आहे. मात्र, ही कारवाई सुरू झाल्‍यानंतर कुणी या कारवाईच्‍या विरोधात जाऊन त्‍या विक्रेत्‍यांना पाठिंबा देऊ नये.
- दामोदर शिरोडकर, नगराध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT