Casino

 

Dainik Gomantak

गोवा

23 डिसेंबरपर्यंत सरकारने कसिनोचा परवाना रद्द करावा, अन्यथा...

कसिनोचा परवाना 23 डिसेंबरपर्यंत रद्द न केल्यास 24 डिसेंबर रोजी पेडणे (Pernem) तालुका कसिनो (Casino) हटाव मंचतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पेडणे तालुका कसिनो हटाव मंचने दिला.

दैनिक गोमन्तक

Pernem: सुकेकुळण - धारगळ येथे होऊ घातलेल्या नियोजित कसिनोमुळे पेडणे तालुक्यात विविध प्रकारे अनिष्ट परिणाम होणार आहेत. सरकारने ह्या कसिनोचा परवाना 23 डिसेंबरपर्यंत रद्द न केल्यास 24 डिसेंबर रोजी पेडणे तालुका कसिनो हटाव मंचतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पेडणे तालुका कसिनो हटाव मंचने दिला.

पेडणे (Pernem) शेतकरी सोसायटीच्या मिनी सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पेडणे कसिनो (Casino) मंचचे अध्यक्ष देवेंद्र प्रभुदेसाई, उपाध्यक्ष व्यंकटेश नाईक, गोपाळ शेट्ये, सचिव अमित सावंत व खजिनदार भारत बागकर उपस्थित होते.

अध्यक्ष प्रभुदेसाई यांनी सांगितले की, पेडणे तालुक्याचा सत्यानाश करणारा कसिनो आम्हाला पेडणे तालुक्यात अजिबात नको. स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy CM Babu Ajgaonkar) हे इनवेस्टमेंट प्रमोशन बोर्डचे संचालक आहेत. उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी प्रमोशन बोर्डने डेल्टा कॉर्पला दिलेले सर्व परवाने सरकारने त्वरित रद्द करावेत. या कसिनोच्या विरोधात संपूर्ण जनता असून जनतेचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. 23 डिसेंबरपर्यंत सरकारने हा सुकेकुळण धारगळ येथील कसिनोचा परवाना (License) रद्द करावा, अन्यथा 24 डिसेंबरपासून सरकारी धोरणाचा निषेध करण्यासाठी पेडणे मामलेदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सरकारी धोरणाचा निषेध करणार असल्याचा इशारा दिला.

समितीचे सचिव ॲड. अमित सावंत म्हणाले की, ह्या कसिनोचा तालुक्यात मोठा उपद्रव होणार आहे. पेडणे तालुक्यात कसिनोच्या विरोधात तीव्र संताप आहे. पेडणेचे आमदार बाबू आजगावकर व मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी या कसिनोबद्दल त्यांचे धोरण स्पष्ट करून जनतेला पाठिंबा द्यावा. कसिनो रद्द न केल्यास त्याविरोधात आम्ही मोठा लढा उभारू.

भारत बागकर म्हणाले कि, मोपा विमानतळाचे आम्ही भव्य दिव्य असे स्वागत केले हे खरे; पण तोच विमानतळ आता विविध प्रकारे पेडणे तालुका गिळंकृत करायाला उठला आहे. या कसिनोमुळे इथला सगळा निसर्ग व संस्कृती नष्ट होणार आहे. प्रत्येक बाबतीत स्थानिक आमदार आजगावकर आपणाला माहीत नाही, अशी भूमिका घेतात. पेडणे व मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी याबाबत लोकांच्या सोबत रहावे.

लोकांच्या भावना लक्षात घ्या

आमचा विकासाला विरोध नाही. पण, कसिनोसारखे घाणेरडे प्रकल्प आणून तुम्ही पेडणे तालुक्याचा सत्यानाश करू नका. आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. त्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन जनतेबरोबर रहायाला हवे. या कसिनोविरोधात प्रत्येक पेडणे तालुक्यातील व्यक्ती ठामपणे विरोधात आहे. सरकारने याची नोंद घ्यावी, असे व्यंकटेश नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT