Rain on bridge Canva
गोवा

Goa Rain Update: आजही ‘रेड अलर्ट’; मोठ्या प्रमाणात पाऊस तसेच वारा वाहण्याची शक्यता

Goa Monsoon: राज्यात पावसाचे धुमशान सुरूच असून झाडे पडणे, दरड कोसळणे असे प्रकार घडत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या १५ दिवसांपासून राज्यात पावसाचे धुमशान सुरूच असून झाडे पडणे, दरड कोसळणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोवा वेधशाळेने शनिवारी रेड अलर्ट जारी केला असून मोठ्या प्रमाणात पाऊस तसेच वारा वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मच्छीमारांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मये येथे गुरुवारी मध्यरात्री भला मोठा वटवृक्ष घरावर कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, घरासमोर पार्क केलेल्या दोन कारसह तीन दुचाकी झाडाखाली चिरडल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाने हे झाड हटविले.

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अनेक भागांत पडझडीच्या घटना नोंदविण्यात आल्या. राज्यात आतापर्यंत एकूण २४६३.२ मिमी म्हणजेच तब्बल ९६.९७ इंच पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ११७.१ मिमी म्हणजेच ४.६१ इंच पावसाची नोंद केली आहे. सामान्य पावसाच्या तुलनेत तब्बल ५६.९ टक्के अधिक पाऊस पडला आहे. अग्निशमन दलाला शुक्रवारी राज्यभरातून सुमारे ५० कॉल्स आले. बहुतांश कॉल हे झाडे कोसळून नुकसान झाल्याचे होते, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT