Mopa Airport |Goa News Dainik Gomantak
गोवा

Mopa Naming Issues: भाऊ, सिक्वेरा, पर्रिकर यांच्यानंतर 'मोपा'साठी आता 'या' नावाची चर्चा

मोपा विमानतळाला नाव कोणाचे?

दैनिक गोमन्तक

मोपा विमानतळाला नाव कोणाचे द्यावे यावरुन गेले काही दिवस राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. या विमानतळाला गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, जॅक सिक्वेरा, भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासह अनेक मान्यवरांचे नाव देण्यासाठी मागणी होत आहे. यात आता स्वातंत्र्यसैनिक डॉ. टी. बी. कुन्हा यांच्या नावाची भर पडली आहे.

(the Goa Freedom Fighters Association has urged the Centre to name the airport after freedom fighter Dr Tristao de Braganza Cunha)

मिळालेल्या माहितीनुसार आज गोवा स्वातंत्र्य सैनिक संघटनेने मोपा विमानतळाला स्वातंत्र्यसैनिक डॉ. टी. बी. कुन्हा यांचे गोव्यासाठीचे समर्पण लक्षात घेता नाव द्यावे असे म्हटले आहे. पोर्तुगीज वसाहती नियमांविरुद्ध लढणारे कुन्हा हे पहिले गोमंतकिय होते. त्यांचा आदर्श भावी पिढीच्या मनात रुजवण्यासाठी मोपा त्यांचेच नाव द्या अशी मागणी केली जात आहे.

“कुन्हा यांना जागतिक शांतता परिषदेने मरणोत्तर सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले आहे. कुन्हा यांनी गोव्याच्या स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी संपादक म्हणून भुमिका बजावली आहे. 1946 मध्ये पोर्तुगालला पाठवले जाणारे ते पहिले गोव्याचे स्वातंत्र्यसैनिक देखील होते. त्यामुळे हे नाव देण्यासाठी संघटना अग्रह करत आहे.

'मोपा'साठी राजकीय पक्षांनी 'या' नेत्यांची केली मागणी

मोपा विमानतळाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. तर भाजपने या विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी विमानतळाला विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिक्वेरा यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा पेच प्रसंग कसा सुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT