Mhapsa  Dainik Gomantak
गोवा

म्हापसा मध्ये विकासाच्या कामांसाठी 140 कोटींची मंचुरी!

दैनिक गोमन्तक

म्हापसा (Mhapsa) येथील तार नदीवरील पुल जुना झाल्यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी तयार होते. हा पुल म्हापसा शहराला बस्तोडा, मयडे व इतर भाग जोडले जातात. त्यामुळे वाहतुकीस पुल अपुरा पडत आहे, म्हणून चौपदरी पुलासाठी 8 कोटी 86 लाख रुपये मंजूर झाले असून हा पुल गोवा साधन सुविधा महामंडळाकडून बांधला जाणार आहे. या पुलांची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या हस्ते 29 नोव्हेंबरला होणार आहे, अशी घोषणा ज्योशुआ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

म्हापसा शहराच्या विकासासाठी आपले वडिल ॲड. फ्रांसिस डिसोझा व आपण अनेक विकासाच्या योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा मतदारसंघासाठी 140 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देऊन निविदा काढल्याचेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष शेखर बेनकर, भाजपा मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक सुशांत हरमलकर, नगरसेविका बाबरा कारास्को, प्रिया मिशाळ, नगरसेवक आशिवाद खोर्जुवेकर, साईनाथ राऊळ, स्वप्निल शिरोडकर, विराज फडके, भाजपा मंडळ सरचिटणीस योगेश खेडेकर उपस्थित होते.

कुचेली येथे कचरा विल्हेवाट प्रकल्पासाठी 5 कोटी 26 लाख रुपये खर्च करून उभारला आहे. येणाऱ्या आठ दिवसात त्याचे उद्‍घाटन होईल, पालिकेची प्रशासकीय इमारतीसाठी राज्य सरकारकडून 2 कोटी 94 लाख मंजूर झाले आहे. लवकरच पायाभरणी करण्यात येणार आहे. गोवा नागरी विकास यंत्रणेच्या माध्यमातून खोर्ली येथील सारस्वत विद्यालयाच्या मैदानाचे नूतनीकरण करण्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये मंजूर होऊन येत्या 25 नोव्हेंबर रोजी नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Urban Development Minister Milind Naik) यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात येणार आहे.

बसस्थानक तीन टप्प्यात

म्हापसा बस स्थानकाचे तीन टप्प्यात काम करण्यात येणार आहे. पहिला टप्पा 3 कोटी 30 लाख रुपयाचा गोवा साधन सुविधा महामंडळातर्फे मंजूर होऊन काम अंतिम टप्यात आले आहे. या स्थानकावर बाहेरील राज्याच्या बसेसना ये-जा करण्याची सुविधा असेल. या बसस्थानकाचे उद्‍घाटन 19 डिसेंबरला करण्याचे ठरविले आहे.

सरकारकडे म्हापसा मतदारसंघात भुयारी वीज पुरवठा वाहिन्यांसाठी प्रस्ताव दिला होता. आपण त्याचा पाठपुरावा केल्यामुळे वीजमंत्री काब्राल यांनी भुयारी वीज वाहिण्यासाठी 116 कोटी रुपये मंजूर केले आहे. या कामाची निविदा स्वस्तिक इन्फ्रा कंपनीला मिळाली आहे. 17 किलो मीटर उच्च दाबाची वीज वाहिन्या व 103 किलो मिटरपर्यंत कमी दाबाची वीज वाहिन्या घालण्यात येणार आहे. पक्षश्रेष्टीकडे आपण वारंवार मंत्री मायकल लोबो यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत आहे.

आता भाजपाच्या पक्ष श्रेष्ठीनी बार्देश मतदारसंघातील सात जागा जिंकण्याचे ठरविले आहे, की मायकल लोबोचे लाड पुरविण्याचे ठरविले आहे, याचा विचार नेत्यांनी करावा. पाणी 16 हजार लीटर मोफत असूनही काही लोकांना भरमसाठ वीज बिले येत आहेत, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. बाजार पेठेमधील मांस व मटण स्टॉल दहा दिवसात सुरू करण्यात येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT