The foundation stone of Raj Bhavan was laid by the President Dainik Gomantak
गोवा

राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनाची पायाभरणी

जुने राजभवन राष्ट्रीय स्मारक : लवकरच होणार पर्यटकांसाठी खुले

दैनिक गोमन्तक

पणजी : दोनापावला येथील जुन्या काबो राजभवनाशेजारी नवे राजभवन उभारण्यात येत असून या नव्या राजभवनाचा पायाभरणी समारंभ राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी राष्ट्रपतीची पत्नी सविता कोविंद, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि विधानसभेचे सभापती रमेश तवडकर उपस्थित होते.

या समारंभात राज्यपालांनी जुने राजभवन राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. नवे राजभवन वापरात आल्यानंतर जुने राजभवन पर्यटकांसाठी खुले करण्याची घोषणाही केली. जुने राजभवन चारशे वर्षापेक्षा जास्त जुने असल्याने तिथे कार्यक्रमांसाठी आणि राहण्यासाठी अनेक मर्यादा येत होत्या. यासाठी राज्य सरकारने 2020 मध्येच नव्या राजभवनची घोषणा केली होती. या नव्या राजभवनचा पायाभरणी समारंभ आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमध्ये राजभवनवर संपन्न झाला.

सकाळी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई आणि त्यांची पत्नी रिटा पिल्लई यांच्या हस्ते पायाभरणीच्या धार्मिक विधीचे सोपस्कर पार पाडण्यात आले. त्यानंतर राज्यपाल राष्ट्रपती कोविंद यांनी पुष्प अर्पण करून पायाभरणी समारंभात सहभाग नोंदवला. यावेळी राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते. या पायाभरणी सोहळ्यानंतर मुख्य कार्यक्रम दरबार हॉलमध्ये संपन्न झाला.

स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, अंतोदय पद्धती राज्याचा कारभार सुरू आहे. राज्य सरकारने विकासाची दशसूत्री अवलंबिली असून आत्मनिर्भर विचाराने राज्य स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. राज्य सरकारच्या विविध योजनांकरिता केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळत आहे. त्यामुळे देशाबरोबर राज्य प्रगती साधत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT