पुराने दिलेल्या तडाख्यात पायवाटेचा धूप झाला आहे. त्यामुळे ही पायवाट सध्या अत्यंत धोकादायक बनली आहे.  Dainik Gomantak
गोवा

पिळगाव येथील पायवाट बनलीय असुरक्षित, संरक्षक कठड्याची आवश्यकता

दैनिक गोमन्तक

डिचोली: पंधरा दिवसांपूर्वी मागील महिन्यात बसलेल्या पुराच्या तडाख्यात सारमानस-पिळगाव येथील पारंपरिक पायवाट धूपून गेली असून, ही पायवाट रहदारीस असुरक्षित आणि अत्यंत धोकादायक (Pedestrian traffic is unsafe and extremely dangerous) बनली आहे. पुराच्या तडाख्यात 'पोंय' (मानस) काठी असलेल्या पायवाटेच्या धडा कोसळल्या असून, अजूनही अधूनमधून पायवाटेची पडझड होत आहे. पिळगाव पंचायत क्षेत्रात (Pilgaon Panchayat Area) येणारी ही पारंपरिक पायवाट 'शॉर्टकट' ('Shortcuts') असल्याने पिळगावसह सारमानस, मुड्डीवाडा, नार्वे भागातील नागरिकांची या पायवाटेवरुन ये-जा चालूच असते. या पायवाटेच्या एका बाजूने 'पोंय' आहे. मात्र पोंयच्या काठी पायवाटेला कोणतेही संरक्षण नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पायवाटेची धडा कोसळत असते. पंधरा दिवसांपूर्वी पुराने दिलेल्या तडाख्यात पायवाटेचा धूप झाला आहे. त्यामुळे ही पायवाट सध्या अत्यंत धोकादायक बनली आहे.

पायवाट असुरक्षित

सारमानस रस्त्याला जोडून असलेली ही पायवाट मुड्डीवाड्यावरुन पिळगावला जोडलेली आहे. साधारण 800 मीटर अंतराची ही शॉर्टकट वाट पिळगाव पंचायत क्षेत्रातील जनतेसह नार्वे आदी भागातील जनतेसाठी ये-जा करण्यास सोयीची ठरत आहे. या भागातील बहूतेक नागरिक याच वाटेचा अवलंब करतात. दरवर्षी शिमगोत्सवात साजरा होणाऱ्या गावातील वार्षिक कळसोत्सव काळात देवीच्या कलशाचे याच वाटेने आगमन होत असते. नार्वे येथे साजरी होणाऱ्या अष्टमीवेळी अनेक भाविक याच मार्गाने ये-जा करतात. यामुळे या पायवाटेला मोठी परंपरा आहे. संरक्षक कठडा बांधून ही पायवाट सुरक्षित करावी. अशी मागील कैक वर्षापासूनची नागरीकांची मागणी आहे. मागील 1971 सालापासून प्रत्येक पंचायत मंडळाच्या कार्यकाळात या पायवाटेसंदर्भात ठराव घेण्यात आलेला आहे. मात्र आजपर्यंत ही समस्या सुटलेली नाही.

दोघांचे बळी

आतापर्यंत या पायवाटेमुळे दोघांचे बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढले की, ही पायवाट पूर्णपणे पाण्याखाली येते. नंतर मात्र या पायवाटेवरुन चालत जाणे, म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. काही वर्षांपूर्वी पायवाटेचा अंदाज आला नसल्यामुळे दोन वेगवेगळ्या घटनांत पाय घसरून दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. स्थानिक पंच अनिल नाईक यांनीही या माहितीस दुजोरा दिला आहे.

कामाला चालना द्या

या पायवाटेचे सुमारे 200 मीटर अंतर हे 'पोंय'च्या काठावर आहे. पोंयच्या काठावर पायवाट कोसळत असते. त्यामुळे त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संरक्षक कठड्याची प्रामुख्याने आवश्यकता आहे. यासंबधीचा प्रस्ताव आर्थिक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सरकारने आर्थिक मंजुरी देवून त्वरित या कामाला चालना द्यावी.

-अनिल नाईक, पंच, सारमानस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT