Purple Fest 2023 | Purple Fest | Purple Fest Goa  Dainik Gomantak
गोवा

Purple Fest: 2023 चा पहिला घोटाळा? पर्पल फेस्टवरून विरोधकांचा सरकारवर घणाघात

पर्पल फेस्टवरून आता गोव्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Purple Fest : दिव्यांगजन आयोग, समाज कल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्या सहकार्याने राष्ट्रीय पर्पल फेस्टची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या उपक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून भारताचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड हे बीजभाषण करणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिलीय. मात्र या फेस्टवरून आता गोव्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. पर्पल फेस्टच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

या 6 ते 8 जानेवारी होणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवादरम्यान गोवा मनोरंजन संस्थेचे संकुल, माकिनेज पॅलेस, आयनॉक्स पणजी, मनोहर पर्रीकर इन्डोअर स्टेडियम-काम्पाल, संजय विशेष स्कूल-पर्वरी, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम- बांबोळी, गेरा स्कूल-जुने गोवे, धारबांदोडा, फोंडा येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र या कार्यक्रमाची निविदा प्रक्रिया उघडण्याआधीच भाजप सरकारकडून काम कसे काय पार पडले असा सवाल गोवा प्रदेश काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांनी उपस्थित केला आहे.

अमरनाथ पणजीकर यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. "पर्पल फेस्ट 2023 चा पहिला घोटाळा आहे. फेस्टची निविदा 2 जानेवारी रोजी याची काढली जाणार आहे. परंतु भाजपच्या इनहाऊस एजन्सीने त्या अगोदरच हे काम सुरू केले आहे. गोवा राज्य अपंग व्यक्ती आयोग याची दखल घेऊन कारवाई करेल. लोकायुक्तांचे हे कृत्य भ्रष्टाचारी आह. या कृत्यामुळे त्यांची समाजाप्रती असंवेदनशीलता उघड करते," असे पणजीकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT