Doctors Dainik Gomantak
गोवा

Eye Transplant Surgery : राज्यात पहिली नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली यशस्वी

डॉ. शॉन डी सिल्वा : नेत्ररुग्णांसाठी ‘एएसजी’ वरदान

दैनिक गोमन्तक डिजिटल

पूर्वी डोळ्याच्या समस्या उद्भवल्यास अनेकांना गोव्याबाहेर चेन्नई किंवा इतर राज्यात जावे लागत होते. मात्र आता करंजाळे, पणजी येथील एएसजी हाॅस्पिटलमध्ये पहिलेच नेत्र प्रत्यारोपण यशस्वी झाले असून गोव्यातील रुग्णांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे एसएसजी नेत्र रुग्णालयाचे संचालक डाॅ. शॉन डी सिल्वा यांनी वाळपई येथील वनविश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. एएसजी आय हॉस्पिटल नेत्र रूग्णांसाठी वरदान असल्याचेही ते म्हणाले.

आज धकाधकीच्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस डोळ्यांची समस्या वाढत आहे. दृष्टीदोष म्हणजे कमी दिसणे म्हणजेच सामान्य भाषेत डोळयाला नंबर लागणे. यात जवळचे किंवा लांबचे अंधूक दिसते. अशा वेळी चष्मा वापरून (भिंग) हा दोष घालवता येतो. यासाठी नेत्रतज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. डोळे हे आमच्या कॅमेऱ्याचे काम करते. जर आपल्याला दिसणे बंद झाले तर अंधत्व येते, असे डी सिल्वा म्हणाले.

एएसजी इस्पितळात माफक दरात शस्त्रक्रिया व इतर उपचार उपलब्ध असून दीनदयाळ योजनेचाही येथे लाभ घेता येतो. 2021 पासून एएसजी इस्पितळात बदलत्या तंत्रज्ञानासुमार शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध आहेत, असे डाॅ. शाॅन डी सिल्वा यांनी सांगितले. यावेळी शेल्डन फर्नांडिस, बेनिटो एरेमिता, कुणाल जोगी यांची उपस्थिती होती.

वाळपईत ३ हजार रूग्णांची तपासणी; 800 चष्मे वितरित

एएसजी हाॅस्पिटल वाळपई येथील शासकीय रुग्णालयात त्यांची सेवा मोफत देत असून सत्तरीत होणाऱ्या विविध आरोग्य तपासणी शिबिरात त्यांनी आजपर्यंत सुमारे ३ हजारच्या वर रुग्णांची तपासणी केली असुन सुमारे 800 जणांना मोफत चष्मे वितरीत केले.

रुपेश गावकरला मिळाली दृष्टी

सत्तरी तालुक्यातील रुपेश या ४२ वर्षाच्या तरुणाला मधुमेह झाला होता. डोळ्यात रक्तस्त्राव होऊन दिसणे कमी होत गेले होते. त्याने वेगवेगळ्या इस्पितळात उपचार घेतले.पण फरक पडता नव्हता. काही डाॅक्टरांनी तुझी कायमची दृष्टी गेली, असेही सांगितले होते. त्यामुळे रुपेश निराश झाला होता.

मात्र, सत्तरीतील आरोग्य तपासणी शिबिरात एएसजी इस्पितळ कर्मचाऱ्यांनी त्याची तपासणी केली. तेव्हा त्याच्या डोळ्यांवर उपचार करण्याचे ठरले. त्यामुळे करंजाळे येथे त्याचे उपचार सुरू झाले. त्यानंतर त्याला हळुहळू दिसू लागले. आता रुपेश गावकर संपूर्ण बरा झाला आहे. डोळ्यांद्वारे पुनर्जन्म मिळाला, असे रुपेश सांगतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT