Massive fire at Dhavali scrapyard Dainik Gomantak
गोवा

Dhavali Scrapyard Fire : अद्याप आग धुमसतेय; झोपडीवजा घरे खाक झाल्याने चार कुटुंबे वाऱ्यावर

आग प्रकरणाला कवळे पंचायतीसह सरकारी यंत्रणा जबाबदार - रेव्होल्युशनरी गोवन्स

गोमन्तक डिजिटल टीम

Dhavali Scrapyard Fire गोव्यात पुन्हा एकदा आगीचे सत्र सुरु झालेले पाहायला मिळत असून लागणाऱ्या आगीविषयी राज्यभरातून चिंता व्यक्त होतेय. काल डिचोलीत एका घराला आग लागून आतील सर्व सामान नष्ट झाले होते, तर पारोडा टेकडीला लागलेली भीषण आग विझवताना अग्निशामक दलाला नाकीनऊ आले होते.

फोंडा ढवळी येथील आरके नामक भंगारअड्ड्याला काल (गुरुवारी) आग लागून लाखो रुपयांचा स्क्रॅप माल जळून खाक झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोविस तास उलटूनही ही आग धुमसत होती.

भडकलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. या धुराची तीव्रता एवढी होती की लगतच्या रस्त्यावरून वाहन चालवणे मुश्‍कीलीचे ठरल्याने ढवळी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

उशिरा संध्याकाळी दुचाकी वाहने सोडण्यात आली.आग विझवण्यासाठी पंधरापेक्षा जास्त टँकर्स आणि दोन जेसीबी यंत्रेही सरकारी यंत्रणेकडून पुरवण्यात आली होती.

आग विझवण्यासाठी पाण्याबरोबरच फोमचाही वापर करण्यात आला. कवळे पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य तसेच इतरांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा अंदाज घेतला. दरम्यान, ढवळीतील भंगारअड्डे बेकायदेशीर असून पंचायतीने कारवाईसाठी पुढाकार घेतला.

मात्र जमीन भाडेपट्टीवर दिलेल्यांकडून या भंगारअड्ड्यांच्या मालकांसह न्यायालयात धाव घेऊन कारवाईला स्थगिती आणण्याचे प्रकार घडत आहेत, त्यामुळेच ही कारवाई होऊ शकली नाही, असे कवळे पंचायतीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आग प्रकरणाला कवळे पंचायतीसह सरकारी यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप रेव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

आगीत संसार जळून खाक झालेल्या चारही कुटुंबांच्या सदस्यांना जेवण-खाण तसेच इतर गरजेच्या वस्तू स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पुरवल्या आहेत,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT