Fire In Goa Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: साट्रे गडावरील आग ही मानवनिर्मित

स्थानिकांचा दावा ः कोणीही आम्हाला विस्थापित करू शकणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Fire In Goa म्हादई अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या साट्रे, देरोडे व करंझोळ येथील ग्रामस्थ या परिसरातील आगीच्या घटना समाजमाध्यमात ज्या पद्धतीने पाहतात, त्यामुळे ते व्यथित झाले आहेत.

परंतु ‘नदीप्रमाणे जंगलही आपल्या जीवनाचा आधार आहे. शहर व जंगलवासीयांची आगीविषयी समज वेगवेगळी आहे. जंगलाचा भाग असून कोणीही विस्थापित करू शकणार नाही,’ असे जेव्हा तेथील व्यक्ती सांगते, तेव्हा त्यांची जंगलाशी असलेली एकरूपपणा स्पष्ट होते.

‘काजूच्या मळ्याचा लिलाव फुलोऱ्याच्या सुरुवातीस होतो. अनेकदा हा लिलाव घेण्यात अपयश आलेले असे कृत्य करू शकतात,’ असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे सत्तरीतील आग मानवनिर्मित होती, असे म्हणता येते. परंतु ठोस पुरावे नाहीत.

खतासाठी लावतात आग-

1) ‘ती आग आमच्यासाठी कधीच धोक्याची नव्हती. कारण अशा आगी विझविण्याची आम्हाला जाणीव आहे. राख हे चांगले खत असते, त्यामुळे लोक जंगलात आग लावतात. परंतु वाऱ्यामुळे उडालेला ठिणग्यांमुळे आग पसरते, तेव्हा ते नैसर्गिकरित्या आटोक्यात आणणे शक्य असते,’ असे येथील रुक्मिणी सांगतात.

2) ‘आग विशेषतः झाडाच्या डहाळ्यांनी विझविली जाते. तुम्ही पाहू शकता येथे कोणतेही वाहन वापरेले गेलेले नाही, जंगलातील वाट असल्याने तुम्हाला चालतच जावे लागते. गावातील लोक ती आग विझविण्यासाठी मदत करतात. हेलिकॉप्टरने आग विझविणे हा एक चांगला प्रयत्न आहे,’ असे देरोडे येथील नीराला वाटते.

वन्यजीव निघून गेले असतील : ‘काजूचे मळे आगीत नष्ट झाले आहेत, असे आम्ही ऐकतो. साहजीकच वनाच्या आजूबाजूची झाडे आगीच्या लपेटात आली असणार आहेत. परंतु आग लागल्यामुळे वन्यजीव तेथून निघून गेले असतील. काही दिवसांनी हे वन्यजीव दृष्टीसही पडतील,‘ असे राजू यांना वाटते.

पाणी आणणारे हेलिकॉप्टर पाहिले

74 वर्षीय विनय यांनी सांगितले, की ज्याचे घर जंगलात लागलेल्या आगीपासून काही किलोमीटरवर आहे, तो त्या ठिकाणावर गेला नसेल. तुम्हाला जो धूर दिसत आहे, त्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी काजूची झाडे आहेत.

ती जागा वनखात्याची आहे आणि तेथे सिदवा देवस्थान आहे. एक दिवस आग जोरदार धुमसत होती, वनअधिकारी त्याठिकाणी पोहोचले होते. पाणी घेऊन येणारे हेलिकॉप्टरही पाहिले आणि त्याच्या पाठोपाठ निघणारा धूरही पाहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Margao: हल्‍ला करण्‍यासाठी राजस्‍थानहून गोव्‍यात बोलावले! मुंगूल प्रकरणी 23 जणांना अटक; बिश्नोई गँग कनेक्‍शन उघड

Rivona: दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, ‘त्या’ शेतमालक महिलेला अटक; बेकायदा फेन्सिंगमुळे घडली दुर्घटना

Power Tariff Scam: भक्‍कम पुरावे नसल्‍याने 'गुदिन्‍हो' सुटले! आरोप शंकेच्या पलीकडे जाऊन सिद्ध न झाल्याने निर्दोष मुक्तता

ED Raid: गोव्यात 'ईडी'ची मोठी कारवाई! 2.86 कोटींची मालमत्ता जप्त; आलिशान व्हिला, अनेक भूखंडांचा समावेश

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

SCROLL FOR NEXT