Movement Dainik Gomantak
गोवा

Mopa Taxi Association Protest: टॅक्सी स्टॅण्डची मागणी पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहील

144 कलम लावले तरी आंदोलन सुरूच

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Taxi Association Protest: मोपा विमानतळावर अधिसूचना काढून जोपर्यंत टॅक्सी स्टॅण्डची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा ग्रीन फिल्ड मोपा एअरपोर्ट टॅक्सी असोसिएशन व मोपा लोकल टॅक्सी असोसिएशनने दिला.

मंगळवारी रात्री मोपा विमानतळ परिसरात 144 कलम लावल्यानंतर आज, बुधवारी सकाळपासून आंदोलकांनी पेडणे येथे सरकारी संकुलासमोरील पालिका उद्यानात धरणे आंदोलन सुरू केले. त्यानंतर संघटनेतर्फे आपला निर्णय जाहीर केला.

यावेळी संघटनेचे नेते भास्कर नारुलकर म्हणाले की, आम्ही गेल्या पाच महिन्यांपासून शांततेने टॅक्सी स्टॅण्डची मागणी करत आहोत. पण प्रत्येकवेळी सरकारने आश्वासन देऊन आमची फसवणूक केली.

या अनुभवामुळे सरकारच्या आश्वासनावर विश्वास नसल्याने आम्ही आज दुपारी एक वाजेपर्यंतची दिलेली मुदत संपल्याने आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. आमची सहनशक्ती संपली असून आम्हाला अटक करा किंवा काहीही करा, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

ॲड. जितेंद्र गावकर म्हणाले की, विमानतळासारख्या मोठ्या प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून टॅक्सी स्टॅण्ड वगैरे प्राधान्याने देण्यात येते. पण सरकार व जीएमआर कंपनीने असे न करता स्थानिकांना प्राधान्य न देता बेकायदेशीररित्या टॅक्सी स्टॅण्ड सुरू केले आहेत.

यापूर्वी स्थानिक आमदार, वाहतूक मंत्री व मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी स्टॅण्डचे आश्वासन देऊन फसवले. हे आंदोलन होण्यास सरकार जबाबदार असून कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील.

माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर म्हणाले की, या विमानतळ प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, यासाठी विमानतळाला पाठिंबा दिला होता.

उलट शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आणि त्यांच्या उपजीविकेचेही साधन नष्ट झाले. सरकार स्थानिकांना जी वागणूक देत आहे, त्या विरोधात आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ.

यावेळी ॲड. शैलेश गावस, टॅक्सी असोसिएशन उत्तर गोवाचे अध्यक्ष चेतन कामत, गोवा राज्य टॅक्सी असोसिएशनचे सचिव गंगाराम फडते यांनीही सरकारचे वाभाडे काढले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT