Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat: मडगावाचा चेहरा मोहरा बदलणार, वर्षभरात मतदारसंघात 'एवढ्या' कोटींची विकासकामे

गोमन्तक डिजिटल टीम

Digambar Kamat गेल्या एक वर्षभरात मडगाव मतदारसंघात 132 कोटी रुपयांची विकासकामे व प्रकल्पांवर खर्च केल्याची माहिती मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येक खात्यातर्फे कोणती कामे व किती खर्च याची एक यादीच कामत यांनी सादर केली.

काही विकासकामे पूर्ण झाली आहेत. काही विकासकामे व प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत तर काही विकासकामे व प्रकल्प लवकरच हातात घेतले जातील, असेही कामत यांनी पुढे सांगितले.

वर्षभरात मडगावात काय कामे झाली आहेत त्याची माहिती लोकांपर्यंत प्रसार माध्यमांमार्फत पोहोचावी म्हणूनच ही पत्रकार परिषद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वाधिक रकमेची कामे गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळातर्फे म्हणजे 82 कोटी चार लाख रुपयांची असल्याचे ते म्हणाले.

त्यात 54 कोटी रुपयांचा रावणफोंड येथे सहा पदरी उड्डाण पुलाचा समावेश आहे. या पुलाच्या कामाला कंत्राटदाराने सुरवात केली असून पायाभरणी लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात येईल, असे ते म्हणाले.

कोंब येथे उड्डाण पूल साकारणार कोंब येथील रेल्वे फाटकाजवळ उड्डाण पुलासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्र्विन वैष्णव राजी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मडगाव कोकण रेल्वेचे ‘आझादी का अमृत महोत्सव’ योजनेअंतर्गत विकास व सुधारणा करण्याचे आदेशही दिल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी कचरा व्यवस्थापन, पार्किंग इमारत, नगरपालिका इमारतीचे सौदर्यीकरण, मडगाव शहरासाठी मास्टर प्लॅन, वाहतूक व्यवस्थापन, न्यू मार्केटची दुरुस्ती, कोमुनीदाद इमारतीची दुरुस्ती या विषयावर काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे व भाजपचे बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते.

आयुष इस्पितळाचे काम लवकरच पूर्ण : पन्नास खाटांच्‍या आयुष इस्पितळाचे काम पूर्णत्वाच्‍या दिशेने असून, जूनपर्यंत ते पूर्ण होईल, असेही कामत म्‍हणाले.

आनाफोंत गार्डनला नवा साज चढविला जाईल व अत्याधुनिक म्युझिकल फाऊंटन तिथे सुरू केला जाईल. हे काम चतुर्थीपूर्वी पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

मडगाव शहरात वीज समस्या नसल्याचे सांगताना ते म्हणाले, गोव्यातील इतर कोणत्याही भागात नसेल तरी मडगावात भूमीगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय चार सब स्टेशने कार्यरत आहेत.

निधीचा वापर

  • वीज खात्यामार्फत ३७.४५ लाख, पर्यटन महामंडळातर्फे ६६ लाख, सिवरेज खात्यातर्फे ५ .६३ कोटी रुपये लाभले.

  • जलस्रोत खात्यामार्फत ७.३३ कोटी, ११ कोटी खर्चून रावणफोंड ते खारेबंदर रस्त्याचे, वाहतूक बेटांचे रुंदीकरण.

  • क्रीडा खात्यामार्फत ५२ लाख रुपये, वन खात्यातर्फे १.४१ कोटी रुपये, सुलभ शौचालयासाठी ८१ लाख रुपये खर्ची.

  • पाण्याची पाईपलाईन बदलण्यासाठी २ कोटी रुपये. लोहिया मैदानाच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ७ लाख रुपये.

  • सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत २१ कोटी रुपये, राष्ट्रीय महामार्गातर्फे ५ कोटी खर्च करण्‍यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT