Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: राज्यातील उमेदवारीचा पेच कायम मुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला

Goa Politics: लोकसभा निवडणूक : भाजपच्या बैठकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यातून महिला उमेदवार निवडण्याचा पेच कसा सोडवावा, या चिंतेत भाजपचे स्थानिक नेतृत्व असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उद्या शनिवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

दक्षिण गोव्यातून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना मुख्यमंत्री काहीतरी करिष्मा करून केंद्रीय नेतृत्वाचा महिला उमेदवाराबाबतचा आग्रह त्यांना सोडण्यास भाग पडतील, असे वाटते.

सरकारी कामानिमित्त होणाऱ्या या भेटीवेळी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हेही उपस्थित असतील. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने शहा यांच्या भेटीवेळी मुख्यमंत्री राजकीय चर्चा करतील, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

दक्षिण गोव्यातील राजकीय वातावरण भाजपसाठी आजवर केवळ दोनच वेळा पोषक होते. आताही भाजपकडे दक्षिण गोव्यात आमदार संख्या बळकट असली, तरी दाबोळी विमानतळ, पोर्तुगीज नागरिकत्व आदी मुद्दे भाजपसाठी त्रासदायक ठरू शकतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दक्षिण गोव्याचा उमेदवार ठरविताना फार राजकीय प्रयोग केले जाऊ नयेत, असे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला वाटते. मुख्यमंत्री हा संदेश शहा यांच्यापर्यंत पोचवतील, अशी चर्चा भाजपच्याच वर्तुळात आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या या बैठकीकडे भाजपसह इतर राजकीय पक्षांचेही लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

Goa Live News: आरोग्यमंत्री राणेंनी घेतली फडणवीसांची भेट; विजयाबद्दल केले अभिनंदन

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

SCROLL FOR NEXT