Goa flights Dainik Gomantak
गोवा

UK E-Visa: देर आए दुरुस्त आए; यूके ई-व्हिसाला भारताचा हिरवा कंदील

गोवा पर्यटन हंगाम आरंभापासून यूके ई-व्हिसाची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

ब्रिटन ते भारत पर्यटनासाठी कोरोना संसर्गादरम्यान ई-व्हिसा सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे भारतात येणाऱ्या ब्रिटीश पर्यटकांना व्हिसा केंद्रात जाऊन प्रत्यक्ष व्हिसा घेण्याची सक्ती करण्यात आली. परिणामत: भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने रोडावली. साहजिकच पर्यटन उद्योगावर याचा अनिष्ठ परिणाम झाला.आता मात्र ब्रिटनसाठी ई-व्हिसा सेवा सुरु करण्यात आली आहे.

(The e-Visa facility will again be available for UK nationals travelling to India)

ई-व्हिसा सेवेअभावी अनेक ब्रिटन पर्यटकांनी भारताकडे पाठ फिरवली आहे. मात्र आता ही सेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तालयाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर व्हिसा वेबसाइट लवकरच अर्ज प्राप्त करण्यासाठी कार्यक्षम होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ब्रिटनवासियांना गोव्यातील पर्यटनासाठीची ई-व्हिसा सेवा पुन्हा उपल्बध होणार आहे.

ई-व्हिसा सेवेअभावी नेमके काय घडले ?

सध्या गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू आहे. यात प्रत्यक्ष कार्यालयात जात व्हिसा काढणे पर्यटकांना त्रासदायक ठरत होते. ही अर्ज प्रणाली अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असल्याने अनेक पर्यटकांनी गोव्यात येणे रद्द केले. यावरुन आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल एजंट संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

ई-व्हिसा सुरू करावा अशी मागणी केली जात होती. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा करून जुनी प्रणाली सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आज यावर निर्णय झाला असून त्यानुसार आज ब्रिटनच्या ई-व्हिसा सेवेला आरंभ करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cunculim: कुंकळ्ळीच्या माथी नवी फिशमिल मारू नका! एल्विस गोम्स यांनी मुख्यमंत्र्यांपुढे पत्राद्वारे मांडली प्रदूषणाची व्यथा

Goa Tourism: "गोव्याचे धबधबे खुले, सुरक्षित पर्यटनावर भर" डॉ. देविया राणे यांचे चतुर्थीपूर्वी 'पर्यटकांना' गिफ्ट

Goa Drug Case: 'त्या' स्विगी बॉयची कसून चौकशी सुरू, पोलिसांच्या हाती लागणार नवे धागेदोरे?

Goa Live News: २५ ऑक्टोबरच्या अखेरीस गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाला विशेष मदत करण्याचे आश्वासन

Goa Water Metro: 'वॉटर मेट्रो' सुरू करण्यासाठी मंत्री फळदेसाई केरळ दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनावाल यांची घेणार भेट

SCROLL FOR NEXT