Goa Dog Bite Dainik Gomantak
गोवा

Dogs In Goa: कुत्र्याने घेतला छोट्या मुलीचा चावा; मालकाविरुद्ध गुन्हा

Dogs In Goa: कामुर्ली येथे एका 10 वर्षांच्या छोट्या मुलीला कुत्र्याने चावल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संबंधित रॉटविलर कुत्र्याचा मालक व केअरटेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कामुर्ली येथे ही घटना घडली.

दैनिक गोमन्तक

Dog In Goa: कामुर्ली येथे एका 10 वर्षांच्या छोट्या मुलीला कुत्र्याने चावल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संबंधित रॉटविलर कुत्र्याचा मालक व केअरटेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कामुर्ली येथे ही घटना घडली.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी संशयित सिद्धार्थ खोर्जुवेकर (मालक) व अनिकेत खोर्जुवेकर (केअरटेकर) यांच्या विरोधात मानवी जीव धोक्यात आणल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सांगितले की, मालकाने कुत्रा सांभाळण्यासाठी त्याच्या भावाकडे सोपवले होते. मात्र, त्यांनी कुत्र्याला सोडले व त्याच्यावर लक्ष ठेवले नाही.

परिणामी, कुत्रा घराबाहेर गेला व त्याने दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा चावा घेतल्याने तिला रक्तस्राव झाला.

याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी मालक व केअरटेकरविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सिद्धार्थ आणि अनिकेत हे दोघे सख्खे भाऊ आहेत.

कामुर्ली येथे दोघेही स्वतंत्र राहतात. त्यांच्या मालकीचा रॉटविलर कुत्रा आहे. पैकी अनिकेत हा या कुत्र्याचा केअरटेकर आहे.

रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास सिद्धार्थ आणि अनिकेत यांनी या कुत्र्याला मोकळे सोडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT