Sanjivini Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivini Sugar Factory: ‘संजीवनी’ कामगारांना ‘व्हीआरएस’चा फतवा

99 जणांवर कोसळणार बेरोजगारीची कुऱ्हाड

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjivini Sugar Factory  संजीवनी साखर कारखान्याच्या कामगारांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यासंबंधीचा फतवा कृषी खात्याच्या संचालकांनी काढला आहे. यासंबंधीचा आदेश संजीवनीच्या प्रशासकांना गुरुवारी देण्यात आला असून 99 कामगारांना घरी पाठवण्याची तयारी सरकारने केली आहे.

दयानंदनगर-धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना गेली तीन वर्षे बंदच आहे. या कारखान्याचा दैनंदिन खर्च व कामगारांचा पगार यासाठी सरकारच्या अर्थ खात्याकडून तजवीज करण्यात येते. कारखान्यात सध्या 177 कामगार आहेत. त्यातील 78 कामगार कंत्राटी तत्त्वावर असून उर्वरित 99 कामगार पूर्णवेळ आहेत.

कारखाना बंद असला, तरी तीन वर्षांसाठी सरकारने तरतूद केली होती. ही तीन वर्षांची तरतूद यंदा समाप्त होत असून पुढील दोन वर्षांसाठी आणखी तजवीज करण्याची मागणी अर्थ खात्याकडे केली होती;

पण अर्थ खात्याने संजीवनीच्या कामगारांना स्वेच्छा निवृत्ती लागू करा, असे सूचवल्याने स्वेच्छा निवृत्तीसंबंधीचे पत्र कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोन्सो यांनी संजीवनीचे प्रशासक सतेज कामत यांना 1 जून रोजी पाठवले.

भाजप सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय कधीच घेतलेले नाहीत. संजीवनी कारखान्याच्या जागेवर राजकीय नेत्‍यांचा डोळा आहे.

कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देऊन भाजप सरकारने माजी मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्वप्नातील संजीवनी कारखानाच हिरावून घेतला आहे. कामगारांच्या हातांना काम द्या, त्यांची रोजीरोटी हिसकावून घेऊ नका.

- अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT