Dilip Sardesai Sports Excellence Award Dainik Gomantak
गोवा

Dilip Sardesai Sports Excellence Award: योग्य उमेदवाराअभावी दिलीप सरदेसाई पुरस्कार रखडला...

राष्ट्रीय क्रीडादिनी नियोजित असलेला कार्यक्रम रद्द करण्याची पाळी प्रशासनावर आली.

Kishor Petkar

Dilip Sardesai Sports Excellence Award

राज्य सरकारच्या क्रीडा व युवा व्यवहार खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्कारासाठी योग्य उमेदवार न मिळाल्यामुळे अखेर मंगळवारी (ता. २९) राष्ट्रीय क्रीडादिनी नियोजित असलेला कार्यक्रम रद्द करण्याची पाळी प्रशासनावर आली.

यासंदर्भात क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की ``राज्याचे क्रीडा सचिव, क्रीडा संचालक व इतर सदस्य असलेल्या पुरस्कार समितीची नुकतीच बैठक झाली.

यावेळी पुरस्कारासाठी तीन अर्ज आले होते, पण एकही उमेदवार आवश्यक निकष पूर्तता करत नव्हता, सर्व इच्छुकांची कामगिरी ज्युनियर आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहे, जी दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्कारासाठी लागू होत नाही. त्यामुळे २०२३-२४ सालच्या पुरस्काराचे वितरण करता येणार नाही, असा निर्णय पुरस्कार समितीने घेतला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग पुरेसा नाही, तर आंतरराष्ट्रीय पदकप्राप्ती आवश्यक आहे, असेही मत समितीने नोंदविले.`` भारताचे महान कसोटी क्रिकेट फलंदाज गोव्याचे सुपूत्र दिलीप सरदेसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोवा राज्य सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी नोंदविणाऱ्या गोमंतकीय क्रीडापटूचा २००८-०९ पासून क्रीडा उत्कृष्टता पुरस्काराने गौरव केला जातो.

पाच वर्षांपूर्वी दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्काराचे शेवटच्या वेळेस वितरण झाले होते. २९ ऑगस्ट २०१८ रोजी भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू शिखा पांडे हिला २०१७-१८ सालचा पुरस्कारांतर्गत २ लाख रुपये, प्रशस्तिपत्रक आणि दिलीप सरदेसाई यांचा अर्धाकृती ब्राँझ पुतळा प्रदान करण्यात आला होता.

मात्र त्यानंतर पुरस्कार वितरण झाले नाही. मध्यंतरी कोविड-१९ मुळे पुरस्कार प्रदान कार्यवाही थांबली. गतवर्षीही पुरस्काराची घोषणा झाली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आर्लेकर, आरोलकर मला घाबरलेत! माजी मंत्री बाबू आजगावकरांचा हल्लाबोल; आमदारकीचा वापर लुटीसाठी केल्‍याचाही आरोप

Mopa Airport Taxi Protest: मोपा टॅक्सी आंदोलन प्रकरणी आमदार सरदेसाईंसह 54 जणांवर गुन्हे दाखल; 15 जूनला चौकशीसाठी पाचारण

Goa Politics: 'प्रभाग आरक्षणाचे निकष स्पष्ट करा, अन्यथा कोर्टात खेचू' सरदेसाईंचा सरकारला इशारा; पालिका निवडणुकीत 'रडीचा डाव' खेळू देणार नाही

Vagator Drug Case: वागातोर ड्रग्ज मृत्यू प्रकरणी हणजूण पोलिसांची इंदूरवारी! तपासात सहकार्य न करणाऱ्या मित्रांच्या रक्ताचे घेतले नमुने; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

सायबर फसवणुकीचे मोठे सिंडिकेट उद्ध्वस्त! 77 कोटींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश, 16 जणांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या; गोव्‍यातून नऊजण ताब्‍यात

SCROLL FOR NEXT