Leopard in Goa Dainik Gomantak
गोवा

Leopard Death : 'त्या’ बिबट्याच्या मृत्यूचा उद्या होणार उलगडा

Leopard Death : विच्छेदनानंतर बिबट्याच्या मृतदेहाची विल्हेवाट वन खात्याने लावली असून अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Leopard Death :

‘फोंडा, पालवाडा-उसगाव येथे मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या बछड्याचे शवविच्छेदन वन खात्याचे डॉ. कुंदे यांनी केले.

मात्र, त्याचा अहवाल सोमवारपर्यंत मिळणार असून त्यानंतरच बिबट्याच्या मृत्युचे कारण उघड होणार असल्याची माहिती वन खात्याने दिली.

१६ फेब्रुवारी रोजी पालवाडा-उसगाव येथे बिबट्याचा बछडा रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत सापडला, तेव्हा तो पूर्णत: सडलेला होता. त्याच्या चारही पायांची नखे अज्ञातांनी पळविली असून कातडी काढण्याचाही प्रयत्न केला होता.

त्यामुळे वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या एखाद्या टोळीचे हे काम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विच्छेदनानंतर बिबट्याच्या मृतदेहाची विल्हेवाट वन खात्याने लावली असून अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT