The deadline given by the government to complete the works of Panaji Smart City ends on May 31 and now 72 hours are left Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: ‘स्‍मार्ट’ आश्‍‍वासन खड्डयांत! सावंत सरकार पुन्‍हा फेल: सर्व कामे 31 मेपर्यंत होणे कठीण

Panaji Smart City: ‘स्मार्ट सिटी’ची कामे पूर्ण करण्‍याची सरकारने दिलेली मुदत ३१ मे रोजी संपत आहे. आता अवघे ७२ तास राहिले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Smart City: ‘स्मार्ट सिटी’ची कामे पूर्ण करण्‍याची सरकारने दिलेली मुदत ३१ मे रोजी संपत आहे. आता अवघे ७२ तास राहिले आहेत. त्‍यामुळे ही कामे पूर्ण होणार नाहीत ही ‘काळ्‍या दगडावरची रेघ’ आहे. तरीसुद्धा कोणाला काहीच पडलेले नाही. जनता मात्र त्‍यात भरडली जातेय. तसेच सरकारप्रति संताप व्‍यक्त करून आपला आत्‍मा शांत करून घेत आहे.

‘स्मार्ट सिटी’चा भाग असलेली भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्‍याचे काम अजूनही ठिकठिकाणी सुरू आहे. दुसरीकडे रस्ते, पदपथ व वाहिन्या जोडण्‍याची कामे जून महिन्यातही सुरूच राहतील, असे सध्‍या तरी दिसून येत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आजही इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिगीस यांच्याकडून कामांची स्थिती जाणून घेतली. त्‍यानंतर मुख्यमंत्र्यांनी ३१ मेपर्यंत कामे पूर्ण होतील, असा दावा केला आहे.

अलीकडेच मुख्‍यमंत्र्यांनी स्‍मार्ट सिटीची ९५ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा केला होता. पण तो किती पोकळ आहे हे आता दिसून येऊ लागले आहे. उच्च न्यायालयातही ३१ मेपर्यंत कामे पूर्ण होतील असे प्रमाणपत्र सरकारच्या वतीने सादर करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे पणजीकरांना आशा वाटत होती. परंतु कामांची सद्यःस्थिती पाहता ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणार नाहीत, हे सांगायला कुणा भविष्यवक्त्याची गरज नाही. आल्तिनो, भाटले आणि मळ्यातील अंतर्गत रस्त्यांची, त्याचबरोबर मलनिस्सारणाच्या मेनहोलची कामे बाकी आहेत. ही कामे ७२ तासांत पूर्ण होतील काय? हा प्रश्‍‍नच आहे. सांतिनेजमधील विवांता चौक ते श्री मारुती मंदिरापर्यंतचे काँक्रीटीकरण व गटाराचे काम अपूर्ण आहे.

काही रस्‍ते वाहतुकीसाठी खुले

पणजीतील श्री महालक्ष्मी मंदिर ते सिंगबाळ बुक स्टॉल हा रस्‍ता काल सोमवारी वाहतुकीसाठी खुला केला आहे. शिवाय आज मंगळवारी सायंकाळी गीता बेकरीसमोरील उद्यानाला वळसा घालणारा सी आकाराचा मार्गही खुला झाला आहे. शिवाय सांतिनेजमधील विवांता हॉटेल जंक्शन ते वेलनेस फार्मसी आणि तेथून मधुबन जंक्शन, काकुलो जंक्शनकडे जाणारे दोन्ही मार्ग रात्री वाहतुकीस खुले केले. त्‍यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला.

एमजी, एबी रोड पावसाळ्‍यानंतरच

पणजीतील महात्मा गांधी रोड, १८ जून रोड, आत्माराम बोरकर मार्ग आणि मळ्यातील रस्‍त्‍याचे काम होणे बाकी आहे. ही कामे आता पावसाळ्यानंतरच पूर्ण होतील. शिवाय काकुलो मॉलसमोरील काकुलो जंक्शन ते मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) हा काँक्रीटीकरणाचा मार्ग तयार करण्याबरोबरच भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम ७ जूनपर्यंत पूर्ण करण्‍यात येणार आहे.

कारचालक माघारी

अगोदर जाहीर केल्‍याप्रमाणे सांतिनेजमधील काँक्रीट झालेले रस्ते आज मंगळवारी रात्री ९ वाजता खुले होणार म्हणून चारचाकी वाहनचालक या मार्गावरून थेट युनियन बँकेपर्यंत आले. परंतु फक्त दुचाकीस्वारांसाठीच रस्ता खुला केल्‍याने चारचाकी वाहनचालकांना माघारी फिरावे लागले. हॉटेल ‘शीतल’ ते काकुलो जंक्शन यादरम्‍यानच्‍या रस्‍त्‍यावरील यंत्रसामग्री रात्रीचे नऊ वाजले तरी हटली नव्हती. परंतु कंत्राटदार, कंपनीच्‍या मालकांनी स्वतः आढावा घेतल्यानंतर ही यंत्रसामग्री हटवली.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

‘स्‍मार्ट सिटी’अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांकडे माझे लक्ष आहे. रस्‍त्‍यांची बहुतांश कामे प्रगतिपथावर आहेत. ३१ मेपर्यंत ती पूर्ण होतील. उरलीसुरली लहान कामेही पूर्ण होतील, असा मला विश्‍‍वास आहे. लोकांना पावसाळ्यात अडचण येणार नाही. त्‍यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT