Bodgeshwar Temple In Mapusa Dainik Gomantak
गोवा

Bodgeshwar Temple: बोडगेश्वर मंदिरातील चोरीप्रकरणी चार संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ

Bodgeshwar Temple In Mapusa: श्रीदेव बोडगेश्वर मंदिरातील चोरी प्रकरणातील चारही संशयित चोरट्यांना म्हापसा न्यायालयाने अतिरिक्त तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

गोमन्तक डिजिटल टीम

Bodgeshwar Temple In Mapusa: म्हापसा येथील जागृत देवस्थान श्रीदेव बोडगेश्वर मंदिरातील चोरी प्रकरणातील चारही संशयित चोरट्यांना म्हापसा न्यायालयाने अतिरिक्त तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

चोरी प्रकरणातील राजू फरत शेख (२७, रा कोलकाता, पश्चिम बंगाल व मूळ बांगलादेश), इम्रान शहीद शेख (२४, रा. सुरत गुजरात), राकीब कुलमोहम्मद शेख (२८, रा. सुरत गुजरात) व मुजाहिद गुलजार खान (२८, रा. पुणे व मूळ झारखंड) यांना मंगळवारी २१ रोजी पोलिसांनी म्हापसा न्यायालयात हजर केले असता संशयितांना अजून तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

म्हापसा पोलिसांनी शनिवारी ११ रोजी संशयित आरोपींना खोपोली महाराष्ट्र पोलिसांकडून हस्तांतरित पध्दतीने ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर संशयितांना न्यायालयाने ९ दिवसांची पोलिस कोठडीत सुनावली होती.

गेल्या २९ एप्रिल २०२४ रोजी उत्तररात्री २.०५ ते २.३८ च्या सुमारास हा बोडगेश्वर मंदिरात चोरीचा प्रकार घडला होता. चार अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील सुरक्षारक्षक फिर्यादी दशरथ ठाकूर (६१) यांना धमकावून व खुर्चीला बांधून दोन फंडपेट्या फोडल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Life Course Immunization: हृदयरोग, मधुमेह, कर्करोगग्रस्तांना मिळणार लसीचे कवच! गोव्यात 'लाईफ-कोर्स इम्युनायझेशन 2026-2036'ची अंमलबजावणी सुरू

Greater Noida Bus Fire: डोळ्यांसमोर सगळं संपलं, प्रवाशांच्या किंकाळ्यांनी हादरला परिसर, यमुना एक्सप्रेसवेवर स्लिपर बसला भीषण आग; 9 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Electoral Roll: मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी पात्र म्हटले, पण अंतिम यादीत नावच नाही! गोव्यातील 97 प्रकरणांमुळे निवडणूक यादीच्या तांत्रिक नियंत्रणावर चर्चा

Horoscope 24 Saptember 2026: व्यवसायात भरभराट, धनलाभ आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार! ग्रहांच्या शुभ योगामुळे चमकणार 'या' राशींचे नशीब; आजचा दिवस ठरणार महत्त्वाचा

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

SCROLL FOR NEXT