

Daily Horoscope 24 September 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार (24 सप्टेंबर) हा दिवस सर्व बारा राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संमिश्र फळे देणारा ठरणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार आज काही राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत, तर काही राशींना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. चला तर मग आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...
मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्याचा राहणार आहे. करिअर किंवा व्यवसायात एखादे मोठे पाऊल उचलावे लागू शकते. कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करु नका आणि मनाची एकाग्रता कायम ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि आरोग्याची स्थिती उत्तम राहील. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे मतभेद दूर करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
वृषभ रास असणाऱ्या व्यक्तींच्या मनात आज अनावश्यक चिंतेचे सावट राहू शकते. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा फार विचार करुन वर्तमानकाळ खराब करु नका. आर्थिक बाबतीत केलेले जुने नियोजन आज उपयोगी पडेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची दाट शक्यता असून, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ मिळाल्यामुळे रखडलेली सर्व कामे वेळेत पूर्ण होतील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी जुनी गुंतवणूक किंवा एखादी जुनी सवय भविष्यातील प्रगतीत अडथळा ठरु शकते, त्यामुळे परिस्थितीनुसार योग्य ते बदल स्वीकारणे गरजेचे ठरेल. सामाजिक क्षेत्रात आणि संभाषणात तुमचा प्रभाव वाढेल. नवीन वस्तू किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस पूर्णपणे अनुकूल आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवा.
कर्क रास असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ऊर्जेने आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक होईल आणि प्रगतीच्या नवीन संधी समोर चालून येतील. मात्र, कोणाशीही वाद घालणे टाळावे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कुटुंबात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल.
सिंह राशीच्या जातकांना आज अचानक एखादी महत्त्वाची बातमी किंवा फोन कॉल येऊ शकतो, ज्यामुळे तुमचे संपूर्ण दैनंदिन नियोजन बदलू शकते. बोलताना आणि वागताना विशेष संयम बाळगणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गासाठी व्यवस्थापन सुधारल्याने मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मेहनतीचा असला तरी कष्टाचे योग्य फळ नक्की मिळेल.
कन्या रास असणाऱ्या व्यक्तींची मेहनत आणि कामावरील निष्ठा आज रंग दाखवेल. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली सर्व कामे मार्गी लागतील. भूतकाळात केलेल्या योग्य गुंतवणुकीतून चांगला आर्थिक परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी दूर झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.
तुळ राशीच्या जातकांना आज थोडा विश्रांतीची आणि मानसिक शांततेची गरज आहे. सततच्या धावपळीतून वेळ काढून स्वतःसाठी काही क्षण घालवा. खाजगी नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती किंवा आर्थिक लाभाची एखादी गोड बातमी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे नियोजन होऊ शकते.
वृश्चिक रास असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. तुमची आध्यात्मिक आवड वाढेल आणि मन शांत राहील. व्यावसायिक क्षेत्रात सुरु असलेल्या चढ-उतारांपासून सुटका होईल आणि उत्पादनात वाढ होईल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस अत्यंत शुभ आहे.
धनु राशीच्या जातकांसाठी व्यवसायात नवीन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या बळावर तुम्ही कठीण कामेसुद्धा सहजरीत्या पार पाडाल. मात्र, आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. जुन्या मित्रांच्या गाठीभेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मकर रास असणाऱ्या व्यक्ती आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर प्रत्येक आव्हानावर मात करतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी उत्तम राहील आणि करिअरच्या दृष्टीने नवीन मार्ग खुले होतील.
कुंभ राशीच्या जातकांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यशैली आज प्रत्येकाचे लक्ष वेधून घेईल. वरिष्ठांच्या मोलाच्या सहकार्यामुळे रखडलेले महत्त्वाचे प्रकल्प पूर्णत्वास जातील. अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल. मीन राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण झाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात घवघवीत यश मिळेल आणि कलात्मक कामांकडे कल वाढेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.