Kadamba  Dainik Gomantak
गोवा

KTC: सामाजिक कर्तव्य बजावताना महामंडळाची होतेय दमछाक, विद्यालयांकडून आणखी 19 बसेसची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Transport Corporation Limited राज्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचे काम सामाजिक कर्तव्य म्हणून कदंब वाहतूक महामंडळ करीत आहे. परंतु असे असतानाही सेवेत असलेल्या 200 बसेसही सध्या कमी पडत आहेत. महामंडळाकडे आणखी 19 बसेसची मागणी प्रलंबित आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका-एका शाळेला सहा-सात बसेस दिलेल्या आहेत. आठवी ते दहावी किंवा आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचे काम बसेस करतात. काही संस्थांनी गेली दोन तीन वर्षांपासून आणखी बसेस देण्याची मागणी महामंडळाकडे केली आहे.

महामंडळाकडे साधारण साडेसहाशे बसेस आहेत. त्यातील 500 डिझेल या इंधनावर चालणाऱ्या, तर दीडशे या बॅटरीवर चालणाऱ्या बसेस आहेत. महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी वार्षिक पासेसमध्ये 70 टक्के एवढी मोठी सवलत दिली गेली आहे. त्यामुळे सामान्य लोकांचा पाल्यांना कदंब बसेसद्वारे शाळांमध्ये पाठविण्याकडे कल असतो.

अशी होते वाहतूक

महामंडळाकडे डिझेलवर चालविण्यात येणाऱ्या 500 बसेस आहेत. त्यातील दररोज म्हणजे आठवड्यातील सहा दिवस 200 बसेस सकाळी ते दुपारी शाळा सुटेपर्यंत व्यस्त असतात.

शाळांच्या मुलांना ने-आण करण्याबरोबर मधल्या काळात सरकारी कर्मचारी पोहोचविण्याचे कामही या बसेसना पार पाडावे लागते. दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी पोहोचल्यानंतर या बसेस पुन्हा प्रवाशी सेवेत रुजू होतात, असा सर्व खेळ महामंडळाला पार पाडावा लागतो.

30 हून अधिक बसेस मोडकळीस!

राज्य सरकारने जाहीर केलेल्या 15 वर्षांवरील वाहनांना मोडीत काढण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभच या महामंडळाकडून झाला आहे. त्यातूनच वर्षाकाठी 30 च्यावर बसेस मोडकळीसाठी येतील, अशी शक्यता आहे.

एका बाजूला डिझेलवरच्या बसेस कमी करून विजेवर चालणाऱ्या बसेस आणण्याकडे सरकारचा कल आहे. असे असताना जर सर्व विजेवरील बसेस झाल्यास महामंडळाला विद्यार्थी सेवेसाठी या बसेस वापरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे दिसते असे प्रथमदर्शनी तरी दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

SCROLL FOR NEXT