CourMolestation Newst Dainik Gomantak
गोवा

विनयभंगप्रकरणी रॉड्रिग्ज बंधूंवरील आरोप निश्‍चितीवर शिक्कामोर्तब

Molestation News: आव्हान अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला

दैनिक गोमन्तक

Molestation News: विनयभंगप्रकरणी आरोप निश्‍चितीच्या आदेशाला तेरेखोल -केरी येथील संशयित रॉड्रिग्ज बंधूंनी सादर केलेला आव्हान अर्ज म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

तक्रारदार महिलेने सादर केलेल्या तक्रारी तसेच दुखापत प्रमाणपत्र पुराव्यावरून प्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध ठेवण्यात आलेल्या आरोपासंदर्भात खटला सुरू करण्यास पुरेसे आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

तक्रारदार महिला तसेच संशयित रोझारिओ रॉड्रिग्ज व सेबिस्त्यांव रॉड्रिग्ज यांच्यात वादावादी झाल्या होत्या. त्यावेळी तेथे आलेल्या एका महिलेने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या संशयितांनी तक्रारदार पकडताना विनयभंग केला होता. याप्रकरणी तिने पेडणे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

ही घटना 7 मार्च 2019 रोजी घडली होती. त्यानंतर संशयितांनी तिला व तिच्या मुलीलाही जीवे मारण्याची धमकी दिल्यावर दुसरी तक्रार 17 मार्च 2023 रोजी पोलिस दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासकाम करून संशयिताविरुद्ध पेडणे प्रथमश्रेणी न्यायालयात भादंसंच्या कलम 356, 506(2) व 323 खाली आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्राला संशयितांना सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

पोलिसांनी याप्रकरणी साक्षीदाराची जबानी नोंद केली होती, त्याने असा प्रकार घडलाच नसल्याचे सांगितले होते, मात्र त्याच्या या जबानीवर विश्‍वास ठेवणे योग्य नाही. तक्रारदाराने स्वतः दिलेल्या तक्रारीत विनयभंग झाल्याचे नमूद केले आहे. तिने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबानीतही त्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे याची शहानिशा खटल्यावरील सुनावणीवेळी न्यायालयातच स्पष्ट होईल.

दोन तक्रारी...

गुन्हा घडल्याचा कोणताही पुरावा तक्रारदाराने सादर केला नसला तरी दाखल झालेल्या दोन तक्रारी व वैद्यकीय दुखापत प्रमाणपत्र संशयितांविरुद्ध आरोप ठेवण्यात पुरेसे आहे. त्यामुळे प्रथमश्रेणी न्यायालयाने आरोप निश्‍चितीच्या दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coal Protest: 'कोळशाला विरोध करण्यासाठी गोव्यातील जनतेने सहभागी व्हावे'! सरदेसाईंचे आवाहन; जागृती सभेचे आयोजन

तुफान वादळ, खवळलेला अरबी सागर; 11 दिवस जीवाचा संघर्ष केल्यानंतर 31 मच्छिमारांची घरवापसी

Verca Parasailing Accident: पॅराशूट भरकटले आणि अडकले माडात! ‘त्या’ व्यावसायिकाचा परवाना रद्द; पर्यटन खात्‍याची कारवाई

Oceanman Controversy: मच्छीमारांनी काय करावे? 'ओशनमॅन'वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; प्रशासन पूर्णपणे खालावल्याचे आरोप

EV Bus Strike: पणजीच्या प्रवाशांना 'स्मार्ट शॉक', 48 इलेक्ट्रिक बसेस अचानक गायब; वेतन थकल्यामुळे बस चालकांचा संप

SCROLL FOR NEXT