Major Accident On Banastarim Bridge  Dainik Gomantak
गोवा

Banstarim Accident Case: ‘एफएसएल’ अहवालामुळे आरोपपत्रास होतोय विलंब

Banstarim Accident Case: बाणस्तारी अपघातः तपास अंतिम टप्प्यात, क्राईम ब्रँचची माहिती

दैनिक गोमन्तक

Banstarim Accident Case: अडीच महिन्यापूर्वी बाणस्तारी पुलाजवळ झालेल्या भीषण अघातप्रकरणी क्राईम ब्रँचकडून सुरू असलेला तपासकाम पूर्ण होत आला असून अपघाताशी संबंधित न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा (एफएसएल) अहवाल अजून हाती आलेला नाही.

त्यामुळे या अपघातप्रकरणातील संशयित परेश सिनाय सावर्डेकर याच्यासह तिघांविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात विलंब होत आहे.

हा अहवाल हाती आल्यावर लगेच आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातप्रकरणी सुमारे ३० हून अधिक साक्षीदारांच्या जबान्या नोंदवल्या आहेत.

अपघाताशी संबंधित वाहन चालक तसेच त्यातील प्रवासी, संशयित परेशची पत्नी मेघना तसेच त्यांची तीन मुले तसेच घटनास्थळी जमलेल्यांचा व अपघाताची माध्यमांना माहिती देणाऱ्यांचा त्यात समावेश आहे.

वैद्यकीय अहवाल तसेच संशयित परेशचा मद्यचाचणी अहवाल हाती आला आहे.

घटनास्थळी पंचनामा करताना गाडीत सापडलेल्या काही संशयास्पद वस्तूंचाही अहवाल येणे बाकी आहे. ‘आप’चे समन्वयक ॲड.अमित पालेकर व परेश सावर्डेकर याचा चालक गणेश लमाणी याचाही या गुन्ह्याशी संबंध असल्याने त्यांचाही आरोपपत्रात समावेश करण्यात येणार आहे.

याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, पुरावे नष्ट केल्याचा तसेच पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवलेला असून आरोपपत्र सादर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

संशयित परेश सावर्डेकर याने मद्यधुंद अवस्थेत मर्सिडीज गाडी चालवून बाणस्तारी पुलाजवळ समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीवरील एका जोडप्याचा तसेच दुसऱ्या एका दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. म्हार्दोळ पोलिसांनी या अपघातप्रकरणी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला होता.

संशयित चालक श्रीमंत असल्याने म्हार्दोळ पोलिसांकडून होत असलेल्या तपासाबाबत स्थानिकांनी तसेच मृताच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्याने हा तपास क्राईम ब्रँचकडे दिला होता.

या क्राईम ब्रँचने तपास हाती घेतल्यावर ॲड. पालेकर यांना चौकशीअंती व गणेश लमाणी यालाही अटक करण्यात आली होती.

सावर्डेकर, पालेकर,लमाणी जामिनावर

सध्या या अपघातातील संशयित परेश सावर्डेकर याच्यासह सहसंशयित ॲड. अमित पालेकर व गणेश लमाणी हे सशर्त जामिनावर आहेत. संशयित परेश याची पत्नी मेघना सावर्डेकर हिलाही न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.

तिची पोलिसांनी साक्षीदार म्हणून जबानी नोंद केली आहे. संशयित परेश हाच गाडी चालवत होता, अशी जबानी तिने व मुलानी पोलिसांना दिली आहे.

त्यामुळे ते सर्वजण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होऊ शकतात. तपास पूर्ण होत आला आहे, मात्र ‘फॉरेन्सिक लॅब’कडून काही नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे, अशी अधिकाऱ्याने माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

SCROLL FOR NEXT