Altinho Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate यांनी रस्ता दिला, तो आमच्या मालकीचा! - आल्तिनोवरील झोपडपट्टीवासीयांची दादागिरी

पणजीतील ‘व्होट बँक’ सांभाळण्याच्या नादात या झोपडपट्टीवासीयांनी आता बस्तान पक्के केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे नाव घेत आल्तिनोवरील झोपडपट्टीवासीयांची सध्या दादागिरी वाढली आहे. आलिशान घरांचे स्वप्न पाहणाऱ्या या झोपडपट्टीवासीयांची आता पक्की घरे झाली.

त्यात एअर कंडिशनरचा वापर होऊ लागला. या वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर सरकारी वसाहतीतील वाहनांना मज्जाव आहे.

पणजीतील ‘व्होट बँक’ सांभाळण्याच्या नादात या झोपडपट्टीवासीयांनी आता बस्तान पक्के केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील सरकारी जागा एका नागरिकाने राजकीय वरदहस्तामुळे आपल्या नावे केल्याची चर्चा जोरात आहे.

महापालिकेतील नगरसेवकांना पाडण्याची आणि निवडून आणण्याची ताकद या झोपडपट्टीवासीयांमध्ये असल्याचे सांगितले जाते.

कार्यालयात हेलपाटे

सरकारी वसाहतीतून या झोपडपट्टीत जाण्याचा मार्ग आमदार मोन्सेरात यांनी करून दिल्याने तो आमच्यासाठी खास असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. येथील एका नागरिकाने ही राहती सरकारी जागा आपल्या नावे केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

त्यामुळे आता आजूबाजूचे लोकही आपल्या नावे जागा होणार, या आशेने आमदारांच्या मिरामार कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.

महापालिका शांतच! : महापालिकेला ही वसाहत झाल्यापासून काहीच करता आले नाही; कारण महापालिकेत मोन्सेरात यांची सत्ता राहिली आहे. मतांसाठी ही वसाहत महत्त्वाची आहे.

याठिकाणी मोन्सेरात यांच्या मर्जीतील नगरसेवक डोळे झाकून निवडून येऊ शकतो, तो अशा मतांमुळेच. आता या लोकांची पक्की घरे झाली आहेत, त्यामुळे त्यांना हटविण्याचे धाडस महापालिका करण्याची शक्यता कमीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT