Amit Shah In Goa Dainik Gomantak
गोवा

Amit Shah In Goa : शहांच्या सभेद्वारे ‘भाजप’ने फुंकले रणशिंग; तयारी लोकसभेची

अमित शहांकडून ‘दक्षिण’ दिग्विजयाचे आवाहन ; सभेला कार्यकर्त्यांची गर्दी

दैनिक गोमन्तक डिजिटल

भारतीय जनता पक्षाने फर्मागुढीच्या या विस्तीर्ण पठारावरील मैदानावर आयोजित केलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेद्वारे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवून रणशिंग फुंकले आहे. ही सभा केवळ दक्षिण गोव्याची गमावलेली जागा जिंकण्यासाठी घेत असल्याचे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या सभेचा उद्देश स्पष्ट केला.

वास्तविक लोकसभा निवडणुकीला वर्ष शिल्लक आहे, तरीपण आतापासूनच भाजप कार्यकर्ते उत्तर आणि दक्षिण गोव्याची जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागले आहेत, त्याचाच ही सभा म्हणजे संदेश असल्याचे बोलले जात आहे. उत्कृष्ट नियोजन केल्यामुळेच ही सभा यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.या सभेला मोठा जनसमुदाय जमल्याचेही दिसून आले.

सदर सभेसाठी माजी खासदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे कष्ट घेतले होते, त्याचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया काही सदस्यांनी व्यक्त केली. ही सभा आयोजित करून भाजपने एका अर्थाने लोकसभा निवडणुकीचे गोव्यात बिगुल फुंकले आहे.

या सभेला महिला वर्गाची मोठी उपस्थिती होती. विशेषतः दक्षिण गोव्यातून लोकांना मोठ्या संख्येने आणले होते. दुपारी तीन वाजल्यापासूनच सभास्थळाकडे बसगाड्या यायला सुरवात झाली होती. पार्किंगसाठी मोकळी जागा असल्याने वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न उपस्थित झाला नाही. सभा संपल्यावरही लोकांना घरी परतण्यास फारसे त्रास झाले नाहीत.

सभेला प्रचंड जनसमुदाय

फर्मागुढीतील भाजपच्या या जाहीर सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. भाजपने पंचवीस हजार लोकांचा आकडा सांगितला होता, तो आकडा कदाचित या सभेने गाठला असावा, असा कयास व्यक्त करण्यात आला. राज्यभरातून बसगाड्यांतून लोकांना सभास्थळी आणण्यात आले. दुपारी तीन वाजल्यापासूनच वाहने यायला सुरवात झाली होती.

अमित शहांनी घेतले नागेशाचे दर्शन!

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बांदोड्यातील नागेश देवाचे दर्शन घेतले. सभा संपल्यानंतर अमित शहा नागेशीला गेले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची यावेळी उपस्थिती होती. स्थानिक आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर तसेच देवस्थानचे अध्यक्ष दामोदर भाटकर यांनी अमित शहा यांचे स्वागत केले. मंदिराचा परिसर पाहून अमित शहा यांनी कौतुकोद्गार काढले.

सभास्थळी माहोल असा..

भर उन्हात ताटकळत बसले लोक, लोकांसाठी पाण्याची चांगली सोय, ढोलताशा पथकाने केले मनोरंजन, कडक तपासणीचा मात्र अभाव, नाक्यानाक्यांवर पोलिस तैनात, अमित शहांकडून राज्यासाठी नवी घोषणा नाहीच, वक्त्यांपैकी रवी नाईक यांच्या भाषणाला जोरदार दाद, भाजपसह पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल घोषणा, मगो नेते सुदिन ढवळीकर व्यासपीठावर पहिल्या रांगेत

लोकसभेला भाजपलाच निवडून द्या !

अमित शहा म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात परिवारवाद, वंशवाद आणि जातीयवाद पाहिले. मात्र, भाजपने देशाला समृद्धतेकडे नेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आत्मनिर्भरतेकडे नेण्याची वाटचाल सुरू केली.

जागतिक पातळीवर देशाचा आर्थिक स्तर उंचावण्याची किमया करून काश्‍मिरला मूळ भारतात आणण्यासाठीची कारवाई केली. म्हणूनच लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा भाजपला द्या, असे आवाहन अमित शहा यांनी केले. सूत्रसंचालन माजी आमदार दामू नाईक यांनी केले.

कोण काय म्हणाले

गोव्याची विकासाची वाटचाल जोरात सुरू असून राज्य आणि केंद्र सरकार अशा डबल इंजिनमुळेच हे शक्य झाले आहे. काँग्रेसचे खासदार गोमंतकीयांना कधी दिसले नाहीत, दिल्लीहून आल्यानंतर फक्त पत्रकार परिषदातून काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन दिसतात. यावेळेला दक्षिण गोव्यातून भाजप उमेदवार निवडून आलाच पाहिजे. त्याकरिता गोमंतकीयांना साथ द्यावी.

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

गत वेळेस भाजपची दक्षिण गोव्याची खासदारकी हुकली. पण आता ती संधी काँग्रेसला देऊ नका. उत्तर गोव्याप्रमाणेच यावेळेला दक्षिण गोव्यातील भाजपचा उमेदवार निवडून आणा. विकासासाठी भाजपविना पर्याय नाही.

- श्रीपाद नाईक, केंद्रीय राज्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anjunem Dam Water Level: अंजुणे जलाशयाची पातळी खालावली, 15 टक्केच जलसाठा; पेयजल उपलब्धतेबरोबरच गुणवत्तेवरही गंभीर प्रश्न

Shirgao Murder Attempt: गावकरांवर पूर्ववैमनस्यातून हल्ला, 2 ठिकाणी गोळीबार; संशयितांना 10 दिवसांची पोलिस कोठडी

Horoscope: भानु सप्तमी आणि अधिकमासाचा महासंयोग! आजपासून 'या' राशींचे सुवर्णदिवस सुरू, होणार प्रचंड धनलाभ

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

SCROLL FOR NEXT