Chief Minister of Goa Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa : सावंत सरकार म्हणजे 'दुर्गंधी युक्त कचरा यार्ड' कॉंग्रेस प्रवक्त्यांचं वक्तव्य

दैनिक गोमन्तक

पणजी - गोव्यातील (Goa) भाजप सरकार (BJP government) म्हणजे दुर्गंधीयुक्त कचरा यार्ड बनले आहे. उच्च न्यायालयाकडुन (High Court) या सरकारला वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने चपराक बसत असुन, बेजबाबदार व अकार्यक्षम डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजिनामा देणे गरजेचे आहे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते ॲड. श्रीनिवास खलप (Shriniwas Khalap) यांनी केली आहे.काल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपिठाने सिव्हरेज महामंडळाकडुन पणजीत (Panaji) उघड्यावर सोडण्यात आलेल्या घाणी बद्दल सरकारची चांगलीच कान उघाडणी केली होती त्यावर प्रतिक्रीया देताना कॉंग्रेस प्रवक्त्याने वरिल मागणी केली आहे.(The BJP government in Goa has become a smelly garbage yard)

आपल्या आदेशात, सदर घाण उघड्यावर सोडण्याचे बंद करण्याचे सोडुन, भाजप सरकारने 2012 ते 2021पर्यंत सदर प्रकार उघडकीस आणणाऱ्या तक्रारदारा विरूद्ध कारवाईचा ससेमीरा लावला त्यावर भाजप सरकारला " तुमच्याकडे आणखी काम नाही का?" असा प्रश्न विचारुन उच्च न्यायालयाने भ्रष्ट भाजप सरकारचे कान पिळले असा टोला ॲड. श्रीनिवास खलप यांनी हाणला आहे.सरकारला आपल्या गलथान कारभारा विरूद्ध बोलणाऱ्यांच्या आड गुन्हे दाखल करण्याची सवय झाली आहे का? असा प्रश्न विचारुन, जनहिताच्या नदरेने तक्रार दाखल करुन न्याय मागणाऱ्यांना सरकारने मदत करणे गरजेचे आहे असे सांगुन उच्च न्यायालयाने भाजप सरकारला भानावर येण्याचा सल्ला दिला आहे.

एका स्टाफ नर्सच्या मागे दक्षता विभागाच्या चौकशीचा ससेमीरा लावण्या ऐवजी सरकारने लोक हितासाठी सदर घाण वाहणे बंद करणे महत्वाचे होते हे सरकारला सुनावले हे बरे झाले असे ॲड. श्रीनिवास खलप यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणातून भाजप सरकारचे सुडाचे राजकारण परत एकदा समोर आले असुन, सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरूद्ध बोलणाऱ्यांची बोलती बंद करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग भाजप सरकार करीत असल्याचे परत एकदा उघड झाले आहे असा दावा ॲड. श्रीनिवास खलप यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: अमित पाटकर इफेक्‍ट?

Goa Crime: मडगाव उपनगराध्‍यक्षांच्‍या पतीविरुद्ध मारहाणीचा प्रयत्‍न केल्‍याची तक्रार; सावळ यांच्याकडून आरोपांचे खंडन

Old Goa Church: ओल्ड गोव्याची चर्च उद्या पर्यटकांसाठी बंद!!

Curchorem Roads: जलवाहिनीसाठी पुन्हा रस्ते खोदणार! कुडचडेत होणार रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती

'गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे'; गुजरातमधील परिषदेत मुख्‍यमंत्री सावंतांचे आवाहन

SCROLL FOR NEXT