Goa News | Sunburn EDM Festival
Goa News | Sunburn EDM Festival Dainik Gomantak
गोवा

Sunburn EDM Festival Case: ...तोपर्यंत 1.10 कोटींची सुरक्षा ठेव परत करू नका : गोवा खंडपीठ

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn EDM Festival Case:राज्यात डिसेंबरच्या अखेरीस हणजूण येथे झालेल्या सनबर्न ईडीएम महोत्सवावेळी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याविरुद्ध सादर झालेल्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली होती.

तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या चौकशी अहवालाला उत्तर देण्यासाठी सनबर्न आयोजक कंपनीने मुदत घेतल्याने त्यावरील सुनावणी 26 एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.

ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत सरकारकडे असलेली 1.10 कोटींची सुरक्षा ठेव परत न करण्याचे निर्देश खंडपीठाने आज दिले.

दरम्यान, सनबर्न महोत्सवासाठी प्रक्रिया नियमांचे उल्लंघन करून परवाने दिले आहेत. हे परवाने 24 तासांत म्हणजे, महोत्सव सुरू होणार असलेल्या दिवशीच दिले होते, असे मुख्य सचिवांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात नमूद केले होते.

आयोजकांना संगीत वाजवण्यासंदर्भात दिलेल्या परवान्याचेही उल्लंघन केल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने उघड केल्याने त्यांची 10 लाखांची सुरक्षा ठेवही जप्त केली आहे.

...अन् प्रतिवादींचे वकील झाले निरुत्तर

राजेश सिनारी यांची जनहित याचिका आज गोवा खंडपीठासमोर सुनावणीस आली असता, कंपनी आयोजकांनी चौकशी अहवालाव्यतिरिक्त सरकारकडून देण्यात आलेल्या परवान्यासंदर्भात फाईल्समधील नोंदणी व टिप्पणीसाठी अर्ज केला आहे.

त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही, असे सांगताच केव्हा अर्ज केला त्याची माहिती द्या, असे खंडपीठाने त्यांना सुनावल्यावर प्रतिवादीचे वकील उत्तर देऊ शकले नाहीत.

ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी प्रतिवाद्यांना चौकशी अहवाल दिला आहे. त्यांना जी काही माहिती पाहिजे ती येत्या तीन दिवसांत दिली जाईल, असे स्पष्ट केले.

कारवाईचा उल्लेखच नाही-

चौकशी अहवालात परवाने देताना झालेल्या त्रुटी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईत केलेल्या त्रुटी यांचा उल्लेख केला आहे. मात्र कारवाईचा उल्लेख नव्हता.

त्यामुळे त्याची माहिती पुढील सुनावणीवेळी दिली जाईल, असे यापूर्वीच सरकारने स्पष्ट केले आहे.

सनबर्न ईडीएम महोत्सवाच्या आयोजकांविरुद्ध म्हापसा न्यायालयात प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT